Share

सायरस मिस्त्री यांच्या शवविच्छेदन अहवालात सर्वात मोठा खुलासा, मृत्यूचे कारण आले समोर, घ्या जाणून सविस्तर

रविवारी अहमदाबाद महामार्गावर डहाणू तालुक्यातील चारोटीजवळ झालेल्या कार दुर्घटनेत टाटा सन्सचे माजी अध्यक्ष, शापूरजी पालनजी उद्योगाचे व्यवस्थापकीय संचालक, प्रसिद्ध उद्योगपती सायरस मिस्त्री यांचा जागीच मृत्यू झाला. सायरस मिस्त्री यांच्या अपघाती मृत्युने एकच खळबळ उडाली.

अपघातादरम्यान, सायरस मिस्त्री यांच्या सोबत कारमध्ये तीन जण आणखी होते. सायरस यांच्यासोबत आणखी एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.अन्य दोन जण जखमी झाले आहेत. जखमींना जवळच्या कासा येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. नंतर त्यांची वापी येथे रवानगी करण्यात आली.

आता मिस्त्री यांचा पोस्टमार्टमचा प्राथमिक अहवाल समोर आली आहे. हाती आलेल्या अहवालानुसार, सायरस मिस्त्री यांच्या पायाला आणि डोक्याला गंभीर दुखापत झाल्याची माहिती समोर आली आहे. हाती आलेल्या अहवालानुसार सायरस आणि त्यांचा मित्र जहांगीर यांचा डोक्याला मार लागल्याने मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे.

अहवालानुसार सायरस मिस्त्री यांच्या डोक्यालाही गंभीर दुखापत झाल्याच समोर आलं आहे. यालाच वैद्यकीय भाषेत पॉलीट्रॉमा असं म्हणतात. या कारणामुळे सायरस मिस्त्री यांचा मृत्यू झाला झाल्याची माहिती हाती आली आहे. तर आता रुग्णालय प्रशासनाने सायरस मिस्त्री यांचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट कासा पोलीस स्टेशनला पाठवला आहे.

ज्या गाडीने ते मुंबईला येत होते त्या कारची किंमत ६८ लाख रुपये आहे. सायरस मर्सिडीज जीएलसी २२० डी ४ मॅटिकमध्ये ते अहमदाबादहून मुंबईला येत होते. मर्सिडीजच्या GLC २२०d सीरीजमधील ही कार अनेक वैशिष्ट्यांनी सुसज्ज आहे. तरीदेखील त्यांचा मृत्यू झाल्यामुळे विशेष वाटत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईला निघालेल्या सायरस यांच्या कारनं पालघरमधील चारोटी टोल नाका ओलांडला. त्यानंतर पुढे सूर्या नदीवर दोन पूल आहेत. या दोनपैकी कोणत्या पुलावरून जायचं याबद्दल अनहिता द्विधा मनस्थितीत होत्या. त्यानंतर  त्यांनी आपली कार जुन्या पुलावरून नेली.

हाती येत असलेल्या माहितीनुसार, हा पूल नव्या पुलाच्या तुलनेत खाली आहे. कार भरधाव वेगात असल्यानं आणि चालक द्विधा मनस्थितीत असल्यानं हा अपघात झाल्याचं अपघातस्थळाची पाहणी करणाऱ्या पोलिसांनी सांगितलं.आता या अपघाताची पोलिसांनी नोंद घेतली असून अहवाल तयार केला असल्याची माहिती हाती येतं आहे.

महत्त्वाच्या बातम्या
पुण्यात डुप्लिकेट मुख्यमंत्र्याची हवा; मंडळांकडून मिळतायत आरतीचे आमंत्रणे, फोटो पाहून थक्क व्हा
Shilpa Shetty: पाय दुखत असतानाही गणपतीसमोर नाचली शिल्पा शेट्टी; चाहत्यांनी ठोकला सला
Ajit Pawar : बबनराव पाचपुतेंना पाडायला अजित पवारांनी खेळला गेम; ‘या’ बड्या नेत्याला उतरवणार रिंगणा
Virat Kohali: पहिल्यांदाच कॅमेऱ्यासमोर विराट-अनुष्का झाले इतके नॉटी, जीभ बाहेर काढून एकमेकांसोबत करू लागले..
इतर ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now