Share

गाडीमधील एअरबॅग उघडून देखील नाही वाचला सायरस मिस्त्री यांचा जीव; काय आहे नेमकं मृत्यूचं कारण, वाचा

टाटा सन्सचे माजी चेअरमन प्रसिद्ध उद्योगपती असणारे सायरस मिस्त्री यांचे काल म्हणजेच रविवारी दुपारी पालघरजवळील एका रस्ते अपघातात निधन झाले. ते अहमदाबादहून मुंबईला येत होते. यावेळी त्यांच्यासोबत कारमध्ये तीन जण आणखी होते. सायरस यांच्यासोबत आणखी एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.

ज्या गाडीने ते मुंबईला येत होते त्या कारची किंमत ६८ लाख रुपये आहे. सायरस मर्सिडीज जीएलसी २२० डी ४ मॅटिकमध्ये ते अहमदाबादहून मुंबईला येत होते. मर्सिडीजच्या GLC २२०d सीरीजमधील ही कार अनेक वैशिष्ट्यांनी सुसज्ज आहे. तरीदेखील त्यांचा मृत्यू झाल्यामुळे विशेष वाटत आहे.

या गाडीत सात एअरबॅग आहेत. पण असे असताना ही सायरस मिस्त्री यांनी आपला जीव गमावला, याबद्दल शंका व्यक्त केली जात आहे. सायरस मिस्त्री यांच्या अपघातात वाहनाचा वेग खूप जास्त असल्याचे बोलले जात आहे. अपघाताच्या वेळी वाहनाचा वेग सुमारे १२५ ते १५० किमी प्रतितास असावा असा अंदाज वर्तवला आहे.

ओव्हर टेक करताना गाडी दुभजकाला धडकली. मात्र धडक इतकी जोरदार होती की त्यांना गंभीर दुखापत झाली. वेगामुळे मृतदेह कारच्या बाहेर फेकले गेले. बोनेटचा खालचा भाग पूर्णपणे उद्ध्वस्त झाला होता. एवढ्या मोठ्या गाडीची ही अवस्था पाहून अपघात किती भयंकर होता, हे समजते.

या मर्सिडीज कारमध्ये सात एअरबॅग होत्या, तरीही सायरस मिस्त्री यांचे प्राण वाचू शकले नाहीत. आतापर्यंतच्या सर्व रस्ते अपघातांमध्ये एअरबॅगने अनेकांचे प्राण वाचवले आहेत, परंतु एअरबॅगच्या सुरक्षिततेला मर्यादा आहेत. अपघातानंतर एखादी व्यक्ती कारमधून पडली तर एअरबॅग त्यांना वाचवू शकत नाही.

या अपघातात एअरबॅग उघडल्या गेल्या, त्यामुळे गाडीतील व्यक्तींची डोके डॅशबोर्डला लागले नाही. मात्र, विंडस्क्रीनची अवस्था पाहता चालक आणि सहप्रवाशाचे डोके विंडस्क्रीनला आदळल्याचे दिसते, मात्र ही बाब तपासानंतरच कळेल, सध्या सायरस यांच्या निधनाने खळबळ निर्माण झाली आहे.

इतर

Join WhatsApp

Join Now