Share

दूध पिणारं बाळ क्षणात रक्तानं माखलं; हृदय पिळवटून टाकणारी घटना वाचून डोळ्यात पाणी येईल

borivali incident

मुंबईतील बोरिवली याठिकाणी एक धक्कादायक घटना घडल्याचे उघडकीस आले आहे. रस्त्याच्या कडेला बसून आपल्या बाळाला स्तनपान करणाऱ्या महिलेला एका भरधाव कारने चिरडलं आहे. या अपघातात आईने हे जग सोडले आहे. तर बाळ जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बावरिया कुटुंब राजस्थानाचे रहिवासी आहेत. मात्र पोटाची खळगी भरण्यासाठी गेल्या दोन महिन्यापासून ठाण्यातील घोडबंदर रोड परिसरात भाडेतत्त्वावर हे कुटुंब राहते. नोकरी न मिळाल्याने मुंबईच्या सिग्नलवर फुगे व स्ट्रीट लाइट विकून उदरर्निवाह सुरू केला.

तसेच याबाबत सांगताना मृत महिलेचा पती धनराज बावरिया म्हणतात, १ फेब्रुवारीला सकाळी पत्नीसोबत कोरा केंद्र सिग्नल येथे फुगे विकण्यासाठी आलो. पत्नी मुलासह सिग्नलच्या दुसऱ्या बाजूला फुगे विकत होती, तर मी दुसऱ्या ठिकाणी होतो. रात्री आठच्या सुमारास पत्नीला कारने धडक दिल्याची माहिती समजताच मी तिच्याकडे गेलो.’

पत्नी लाडबाई (२९) हिला मी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र तिचे निधन झाले. तर या अपघातात जखमी झालेल्या पाच महिन्याच्या चिमुकल्याचं नाव देवांश आहे. मृत महिलेचा पती धनराज बावरीया यांनी बोरिवली पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. फरार झालेल्या कारचालकाचा बोरिवली पोलीस शोध घेत आहेत.

दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून कार्यवाही पूर्ण केल्यानंतर तिचा मृतदेह ताब्यात मिळाला. त्यानंतर बावरिया कुटुंबीय राजस्थानला रवाना झाले आहेत. तेथे पत्नीवर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. धक्कादायक म्हणजे देवांशच्या पायाचे हाड मोडल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.

महत्त्वाच्या बातम्या
गोष्ट कामाची: आता जमिनीचाही असणार आधार नंबर, PM KISAN योजनेतही होणार फायदा
IND vs WI: रोहित-द्रविडला संकटातून बाहेर काढणार व्यंकटेश अय्यर, संघात बदलणार त्याची भूमिका
दोन वर्षात ६ लग्न, सगळ्यांसमोर बाईकवर बसून बॉयफ्रेंडसोबत पळून गेली नवरी; कुटुंबीयही बघतच राहिले
नागरिकांच्या जिवाशी खेळ, पाणी आणि ग्लुकोज भरून बनवली जात होती बनावट कोरोना लस

इतर क्राईम ताज्या बातम्या राज्य

Join WhatsApp

Join Now