सोमवारी सकाळी राजस्थानच्या जोधपुरमधील सीआरपीएफ प्रशिक्षण केंद्रावरून धक्कादायक घटना घडल्याचे समोर आली आहे. एका जवानाने आपली लहान मुलगी आणि बायकोला घरात डांबून ठेवले आणि रागाच्याभरात सुमारे ८ वेळा हवेत अंदाधुंद गोळीबार केला. अखेर त्याने स्वतःला गोळी झाडून जीवन संपवले. (CRPF jawan shot himself beacuse..)
या धक्कादायक घटनेने संपूर्ण जोधपुर सीआरपीएफ ट्रेनिंग सेंटर हादरले. नरेश जाट असे आत्महत्या करणाऱ्या सैनिकाचे नाव असून तो पाली जिल्ह्यातील राजोला गावाचा रहिवासी होता. त्याच्या आत्महत्येचे कारण अजून स्पष्ट झाले नाही.
अधिक माहितीनुसार, हा जवान अनेक दिवसांपासून सुट्टी मिळण्यासाठी प्रयत्न करत होता. परंतु सुट्टी न मिळाल्याने तो वैतागला होता. वरिष्ठांशी त्याचे वाद देखील झाले, तेव्हा असे वागणे न थांबवल्यास काढून टाकण्याबद्दल वरिष्ठांनी त्याला सुनावले होते, असे समजते.
ट्रेनिंग सेंटरच्या जवळच असणाऱ्या क्वार्टरमध्ये तो जवान गेला. रविवारी रात्री त्याने आपल्या बायको आणि ६ वर्षाच्या मुलीला घरामध्ये डांबून ठेवले व घराच्या बाल्कनीत येत हवेत अंदाधुंद गोळीबार केला. त्याचा मोठा आवाज ऐकून ट्रेनिंग सेंटरमधील त्याचे सहकारी धावतच त्या ठिकाणी आले.
सर्व सहकाऱ्यांनी, अधिकाऱ्यांनी त्याला समजावण्याचा खूप प्रयत्न केला. परंतु तो कोणाचं ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. १८ तास अंदाधुंद गोळीबाराचे हे थरारनाट्य चालू होते.
या जवानाने शेवटी सीआरपीएफ आईजी विक्रम सहगल यांच्यासमोर सरेंडर करण्याची अट घातली. त्यानंतर आईजी विक्रम सहगल जोधपूर घटनास्थळी पोहोचले, तेव्हा या जवानाने आईजीसमोरच स्वतःला गोळी झाडत आत्महत्या केली. या घटनेने संपुर्ण देशात खळबळ उडाली आहे.
महत्वाच्या बातम्या-
ठाकरेंनी हकालपट्टी करताच गद्दार आमदार बांगरांचे थेट पक्षप्रमुखांना आव्हान, म्हणाले तुम्हाला तो हक्क नाही
विचित्र आंदोलन! आंदोलक पंतप्रधानांच्या बेडरूममध्ये खेळतायत चक्क WWE, पहा व्हिडीओ
PHOTO: काय ती अदा! प्राजक्ता माळीचा नो ब्लाऊज लुक चर्चेत, फोटो शेअर करत म्हणाली..






