क्रिकेटपटू शेन वॉर्ननंतर आता माजी दिग्गज क्रिकेटपटू अँड्र्यू सायमंड्सच्या निधनाच्या बातमीने सर्वांनाच धक्का बसला आहे. क्रिकेट क्षेत्रात शोककळा पसरली आहे. खेळाडूंपासून चाहत्यांपर्यंत सर्वच सोशल मीडियावर सायंड्सला श्रद्धांजली वाहत आहेत. त्याच्या निधनानंतर त्याच्या आत्तापर्यंतच्या जीवनाबद्दल सर्वत्र चर्चा होत आहे.
ऑस्ट्रेलियाचा माजी अष्टपैलू खेळाडू अँड्र्यू सायमंड्सच्या शनिवारी रात्री झालेल्या अपघातात निधन झाल्याने संपूर्ण क्रिकेट जगतावर शोककळा पसरली आहे. ऑस्ट्रेलियन दिग्गज आणि दोन वेळा विश्वचषक विजेता सायमंड्स 46 वर्षांचा होता.
अँड्र्यू सायमंड्सच्या कारकिर्दीतील कामगिरीबद्दल सांगायचे तर 2003 मध्ये त्याच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे त्याची विश्वचषकासाठी निवड झाली. 2007 च्या विश्वचषकात अँड्र्यू सायमंड्स ऑस्ट्रेलियन संघाचाही सदस्य होता. आयपीएल 2008 सायमंड्स आयपीएल लिलावात सर्वात महागडा खेळाडू ठरला.
सायमंड्सने तीन हंगामात डेक्कन चार्जर्सचे प्रतिनिधित्व केले. सायमंड्सने शेवटची आयपीएल 2011 मध्ये खेळली होती. करिअरसोबतच त्यांची जीवनशैलीही चांगली होती. सायमंड्सने भरपूर कमाई केली आणि प्रचंड संपत्तीचा मालक बनला. ऑस्ट्रेलियन क्रिकेटर अँड्र्यूने करोडोंची संपत्ती मागे ठेवली आहे.
जगातील सर्वोत्तम ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू सायमंड्सची संपत्ती पाच दशलक्ष डॉलर्स इतकी आहे. भारतीय रुपयात, सायमंड्स 38 कोटी 74 लाखांपेक्षा जास्त संपत्तीचे मालक आहेत. सायमंड्सच्या उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत क्रिकेट होता. त्याने देशांतर्गत सामने तसेच विश्वचषक आणि आयपीएलमधून मोठी कमाई केली. सायमंड्स महिन्याला 40 हजार डॉलर्स कमवत होता. त्याच वेळी त्यांचे वार्षिक उत्पन्न 5 लाख डॉलर होते.
अँड्र्यू सायमंड्सला ‘रॉय’ या नावाने देखील ओळख होती. त्याच्या सोबतचे खेळाडू आणि ओळखीचे त्याला ‘रॉय’ नावाने हाक मारत होते. त्याला ‘रॉय’ हे नाव त्याच्या प्रशिक्षकाने दिले होते. हे नाव बास्केटबॉल खेळाडू ‘लेरॉय लोगगिन्स’ यांच्यावरून ठेवले होते. कारण अँड्र्यू सायमंड्स त्यांच्यासारखा होता.