Share

स्वतःची कथा पडद्यावर पाहून प्रवीण तांबे झाले भावूक; म्हणाले, ‘स्वप्न पाहा, एकदिवस ते नक्की पूर्ण होतात’

Kaun Pravin Tambe?

मराठमोळा अभिनेता श्रेयस तळपदे अभिनित ‘कौन प्रवीण तांबे?’ (Kaun Pravin Tambe?) हा चित्रपट १ एप्रिल रोजी प्रदर्शित झाला. हा चित्रपट क्रिकेटपटू प्रवीण तांबे यांच्या कारकिर्दीवर आधारित असून यामध्ये श्रेयसने प्रवीण तांबे यांची भूमिका साकारली आहे. चित्रपटाचे सध्या सर्वत्र कौतुक केले जात आहे. यादरम्यान प्रवीण तांबे यांनी आपली कथा मोठ्या पडद्यावर पाहून खूपच भावूक झाले आहेत. त्यांचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

कोलकाता नाईट रायडर्सच्या खेळाडूंनी प्रवीण तांबे या चित्रपटाचे स्पेशल स्क्रिनिंग पाहिले. यावेळी स्वतः प्रवीण तांबेसुद्धा उपस्थित होते. तर चित्रपट संपल्यानंतर भाषणादरम्यान प्रवीण तांबे भावूक झाल्याचे यावेळी पाहायला मिळाले. केकेआरच्या ट्विटर हँडलवर हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे.

या व्हिडिओत दिसत आहे की, चित्रपट संपल्यानंतर सर्वांनी टाळ्या वाजवून चित्रपटाचे आणि प्रवीण तांबे यांचे कौतुक केले. यावेळी प्रवीण तांबे त्यांच्या भावना व्यक्त करण्यासाठी उभे राहिले असता ते निःशब्द झाले. स्वतःची कथा मोठ्या पडद्यावर पाहून ते खूपच भावूक झाले. त्यानंतर ते एक संदेश देत म्हणाले की, ‘स्वप्न पाहा. कारण एकदिवस स्वप्न नक्कीच पूर्ण होतात’.

https://twitter.com/KKRiders/status/1509776938033811459?s=20&t=EkVbvcG-YVW-mg1jnVwz9Q

त्यानंतर व्हिडिओत पुढे इतर खेळाडू प्रवीण तांबे यांच्याविषयी आणि चित्रपटाविषयी बोलताना दिसून येत आहेत. यावेळी केआरकेचा कर्णधार श्रेयस अय्यर म्हणाला की, ‘आम्ही खूप दिवसांपासून स्क्रिनिंगची वाट पाहत होतो. हा एक अप्रतिम चित्रपट आहे. यामधील गाणीही खूप चांगले आहेत. चित्रपटाने आम्हाला भावूक केलेच. सोबतच चित्रपटाच्या शेवटी प्रवीण तांबे यांचे भावूक भाषण ऐकून आम्हीसुद्धा भावूक झालो’.

हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून अनेकजण प्रवीण तांबे यांचे कौतुक करत आहेत. दरम्यान, ‘कौन प्रवीण तांबे?’ हा चित्रपट १ एप्रिल रोजी डिज्नी प्लस हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन जयदीप देसाई यांनी केले आहे. श्रेयस तळपदेसोबत यामध्ये आशिष विद्यार्थी, परमब्रट चटर्जी आणि अंजली पाटील मुख्य भूमिकेत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या :
लवकरच अंकिता लोखंडेच्या घरीही हालणार पाळणा? लॉकअपमध्ये केला मोठा खुलासा, म्हणाली..
गुड न्यूज! भारती सिंहच्या घरी चिमुकल्याचे आगमन; सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत म्हणाली..
‘मम्मी, मला खूप काही बोलावंसं वाटतंय पण…’. आईच्या निधनानंतर मराठी अभिनेता झाला भावूक

ताज्या बातम्या बाॅलीवुड मनोरंजन

Join WhatsApp

Join Now