hardik pandya talking about suryakumar yadav | टीम इंडियाचा टी २० वर्ल्डकप २०२२ मधील प्रवास संपला आहे. इंग्लंडकडून झालेल्या पराभवाने टीम इंडियावर अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. खेळाडूंच्या कामगिरीपेक्षा संघ निवडीबाबत लोकांमध्ये नाराजीची भावना आहे. दरम्यान, भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याने त्याचा सहकारी सूर्यकुमार यादववर धक्कादायक विधान केले आहे.
बीसीसीआयने सूर्याला टीम इंडियात स्थान देण्यासाठी खूप वेळ घेतला, असे हार्दिकचे मत आहे. सूर्यकुमार यादव सध्या क्रिकेटच्या सर्वात लहान फॉरमॅटमध्ये टीम इंडियाचा सर्वोत्तम फलंदाज आहे. टी २० वर्ल्डकप २०२२ मध्ये, तो अनेक प्रसंगी भारतीय संघासाठी हिरो ठरताना दिसला.
सूर्यकुमार यादवने काही सामन्यांमध्ये महत्वाच्या खेळी केल्या, त्यामुळे भारतीय संघाला सामनेही जिंकता आले. अशात हार्दिक पांड्याने आता त्याच्याबाबत एक वक्तव्य केले आहे. तो म्हणाला की, सूर्यकुमार यादवला खुप उशिरा संघात स्थान मिळाले. त्याला दोन वर्षांपूर्वीच भारतीय संघात स्थान द्यायला हवे होते.
विशेष म्हणजे सूर्यकुमार यादवने गेल्या वर्षीच टीम इंडियात पदार्पण केले होते. केवळ १ ते दीड वर्षांच्या कालावधीत, तो भारताचा सर्वात महत्वाचा फलंदाज बनला आहे. यासाठी त्याने खुप मेहनतही घेतली आहे. पण त्याने खुप कालावधीत स्वत:ला सिद्ध केले आहे.
आयपीएलमध्येही चांगली कामगिरी करत असताना बीसीसीआय त्याला संधी देत नव्हते. ३० वर्षाचा झाल्यानंतर त्याला भारतीय संघात स्थान देण्यात आले आहे. त्याने जर भारतीय संघात आधीच पदार्पण केले असते, तर त्याने संघाला आणखी उंचीवर नेले असते, असे हार्दिक पांड्याने म्हटले आहे.
सूर्यकुमार यादव हा टी २० क्रिकेटपमधील जगातील सर्वोत्तम फलंदाज आहे. परदेशी खेळाडूही त्याचे कौतुक करताना थकत नाहीत. मैदानात सर्वत्र शॉट्स खेळण्याच्या त्याच्या क्षमतेमुळे तो एबी डिव्हिलियर्सच्या क्षमतेचा फलंदाज बनला आहे. सूर्याने टी २० वर्ल्डकप २०२२ मध्ये ५ डावात १७० स्ट्राईक रेट २२५ धावा केल्या आहे.
महत्वाच्या बातम्या-
kalyani jadhav : बिग ब्रेकींग! ‘तुझ्यात जीव रंगला’ मधील अभिनेत्री भीषण अपघातात जागीच ठार; सिनेसृष्टीवर शोककळा
Mansi Naik: लग्नाच्या दिड वर्षातच अभिनेत्री मानसी नाईक घेणार घटस्फोट? म्हणाली, “आयुष्यचा बेरंग…
Cricket: इंग्लंडकडून पराभव झाल्यावर रोहित ढसाढसा रडत होता, खेळाडू बॅगा भरत होते; मध्यरात्री तो मेसेज आला अन्…