Share

इंग्लंडकडून लाजिरवाणा पराभव झाल्यानंतर ढसाढसा रडला रोहीत शर्मा; व्हिडीओ पाहून भावूक व्हाल

Cricket:  भारत विरुद्ध इंग्लडचा टि २० वर्ल्डकप २०२२चा दुसरा सेमी फायनलचा सामना नुकताच पार पडला. हा सामना गुरुवारी (१०नोव्हेंबर) ऍडलेडच्या मैदानावर खेळला गेला. ज्यामध्ये इंग्लंड क्रिकेट संघाने भारताचा पूर्ण १० गडी राखून पराभव केला आणि अंतिम फेरीत प्रवेश करणारा दुसरा संघ ठरला.

प्रथम फलंदाजी करताना भारताने २० षटकांत १६९ धावा केल्या आणि इंग्लंडला आव्हान दिले. परंतु, या आव्हानाला इंग्लंडच्या संघाने १६ षटकांत सहज गाठले आणि भारतावर मोठा विजय नोंदवला. त्याचवेळी, या लाजिरवाण्या पराभवानंतर भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा परतीच्या डगआऊटमध्ये रडताना दिसला. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात १० विकेटने पराभूत झाल्यानंतर डगआउटमध्ये भावूक होताना दिसला. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये रोहित डोक खाली करून स्टँडवर बसलेला दिसत आहे. या पराभवामुळे तो किती निराश झाला होता, हे त्याच्या चेहऱ्यावरून स्पष्ट दिसत होते.

https://twitter.com/shavezcric0099/status/1590665078499840002?t=wbrMgty36H2Q-k7e1v6plg&s=19

इतकंच नाही तर तो स्वत:ला रोखू शकला नाही आणि त्याच्या डोळ्यात पाणीही आलं. त्याचवेळी हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. दुसरीकडे, उपांत्य फेरीतील रोहित शर्माच्या फलंदाजीबद्दल बोलायचे झाले तर, त्याने पुन्हा एकदा आपल्या कामगिरीने सर्वांची निराशा केली. कर्णधार रोहित शर्मा २८ चेंडूत अवघ्या २७ धावा करून बाद झाला. या डावात त्याचा स्ट्राईक रेट फक्त ९६.४३ होता. जे खूपच निराशाजनक आहे.

दरम्यान, भारतीय क्रिकेट संघाने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात ६ गडी गमावून १६८ धावा केल्या आणि इंग्लंडसमोर 169 धावांचे आव्हान ठेवले. त्याचवेळी प्रत्युत्तरात दुसऱ्या डावात फलंदाजीसाठी आलेले इंग्लंड संघाचे सलामीवीर जोस बटलर आणि एलेक्स हेल्स यांनी दमदार फलंदाजी करत टीम इंडियाच्या १० विकेट राखून पराभव केला.

महत्वाच्या बातम्या –

Shrilanka : क्रिकेटविश्वात खळबळ! वर्ल्डकप सुरू असताना ‘या’ स्टार खेळाडूला बलात्काराच्या आरोपाखाली अटक

इंग्लंडविरुद्ध सेमीफायनलसाठी भारताची प्लेइंग 11 झाली निश्चित! कर्णधार रोहित ‘या’ खेळाडूंना देणार संधी

खेळ ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now