चारा घोटाळा प्रकरणातील मुख्य आरोपी असलेल्या लालू प्रसाद यादव (lalu prasad yadav)यांना सीबीआय कोर्टाने दणका दिला आहे. चारा घोटाळा प्रकरणी राजद अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांना पाच वर्षाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. याचबरोबर लालू प्रसाद यांना ६० लाखांचा दंडही ठोठावण्यात आला आहे.
लालू प्रसाद यादव यांना कोर्टाने शिक्षा सुनावताच त्यांच्या चाहत्यांना धक्का बसला. राजदचे राज्य सचिव वसीम अहमद मुन्ना यांना अश्रु अनावर झाले. लालूंच्या शिक्षेमुळे दुखावलेले वसीम अहमद मुन्ना यांना रडू कोसळलं. सध्या हा व्हिडिओ सोशल मिडियावर तूफान व्हायरल होतं आहे.
लालू प्रसाद यादव यांना दिलेल्या शिक्षेची बातमी कळताच वसीम अहमद मुन्ना यांना जिल्हा अधिकारी कार्यालयात अश्रु अनावर झाले. रडत रडत वसीम अहमद मुन्ना म्हणाले की, लालू यादव हे गरिबांचे मसीहा आहेत. कोर्टाने त्यांना शिक्षा सुनावली. त्यांचा न्यायालयावर पूर्ण विश्वास आहे. लालू यादव यांना नक्कीच न्याय मिळेल.’
लालू को सजा होने के बाद मुज़फ़्फ़रपुर में राजद सचिव वसीम अहमद भोक्कार पार के रोने लगे#LaluPrasadYadav #FodderScamVerdict pic.twitter.com/LjvJhgWJXF
— Alok Kumar (@dmalok) February 21, 2022
दरम्यान, लालूप्रसाद यांच्या वकिलांनी लालूंना जामीन मिळावा म्हणून अर्ज करणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. मात्र, लालूंना जामीन न मिळाल्यास त्यांना तुरुंगातच राहावं लागणार असल्याची माहिती सध्या मिळत आहे. तसेच स्पेशल कोर्टाचे न्यायाधीश एसके शशी यांनी हा आजचा निकाल दिला.
तर दुसरीकडे विशेष सीबीआय न्यायालयाने लालू प्रसाद यादव यांना आयपीसीच्या कलम 409, 420, 467, 468, 471, कट रचण्याशी संबंधित कलम 120बी आणि भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या कलम 12(2) अंतर्गत दोषी ठरवले आहे. 14 वर्षांची शिक्षा झालेल्या लालूप्रसाद यादव यांच्यासह 99 जणांविरुद्ध सर्व पक्षकारांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने निकाल राखून ठेवला होता.
दरम्यान, चला जाणून घेऊ या नक्की हे प्रकरण काय? चारा घोटाळा पहिल्यांदा 1996 साली समोर आला. यामध्ये बिहारच्या पशुपालन विभागात करोडो रुपयांचा घोटाळ्याचा खुलासा झाला. 1990 ते 1997 दरम्यान लालूप्रसाद यादव बिहारचे मुख्यमंत्री असताना पशुसंवर्धन खात्याने बिहारच्या विविध जिल्ह्यात कोषागारातून कोट्यवधी रुपये अवैधरीत्या काढल्याचं आरोप आहे.
चारा घोटाळ्यात 3 वेगवेगळी प्रकरण असून तिन्हीही प्रकरणात लालू प्रसाद यादल आरोपी आहेत. सीबीआयने तपासात लालू प्रसाद यांना आधीच दोषी ठरवलं आहे. कोर्टाने दोषी ठरविल्यानंतर 2013मध्ये लालू प्रसाद यादव यांना पाच वर्षाची शिक्षा सुनावली होती. लालू प्रसाद यादव यांचं लोकसभेचं सदस्यत्व काढून घेतलं होतं.
महत्त्वाच्या बातम्या
मुकेश आणि अनिल अंबानी यांच्यात का पडली वादाची ठिणगी? अखेर कारण आले समोर
खाता का नेता, म्हणणारे हे वडापाव विकणारे चाचा कोण आहे माहितीये का?
लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या मुलीने आईची केली हत्या; असा रचला होता ‘कट’, तपास करणारे पोलीसही चक्रावले
भैय्यु महाराजांच्या आत्महत्येच्या प्रकरणात भक्तांनी केली ‘ही’ मागणी, आरोपी हायकोर्टात