जेव्हापासून महाविकास आघाडी सरकार कोसळले तेव्हापासून राज्यात अनेक घडामोडी घडत आहे. काही दिवसांपुर्वीच शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर ईडीने कारवाई करत अटक केली आहे. सध्या ते कोठडीत आहेत. अशातच आता राष्ट्रवादीच्या अनेक बड्या नेत्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
पवार कुटुंबीयांना न्यायालयाने नोटीस पाठवली आहे. त्यामध्ये राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळेंसह अन्य लोकांचाही समावेश आहे. लवासा प्रकरणात त्यांना नोटीस बजावण्यात आली आहे. त्यांचं खासगी हिल स्टेशन लवासा प्रकरण सध्या न्यायालयात प्रलंबित आहे.
ही याचिका निकाली काढण्यासाठी उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. या सर्वांना नोटीस बजावल्यानंतर सहा आठवड्यात भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. नाशिकचे नानासाहेब जाधव यांनी या प्रकरणाला आव्हान दिले आहे.
सोमवारी या प्रकरणावर सुनावणी झाली. यावेळी न्यायमुर्ती धनंजय चंद्रचूड आणि न्यायमुर्ती ए. एस. बोपन्ना उपस्थित होते. त्यावेळी न्यायालयाने प्रदिवाद्यांना नोटीस बजावण्याचे आदेश दिले. पवार कुटुंबियांसहित कृष्णा खोरे विकास महामंडळ, लवासा कॉर्पोरेशन, हिंदुस्तान कन्स्ट्रक्शन, पुण्याचे जिल्हाधिकारी, राज्याचे विकास आयुक्त यांनाही नोटीस बजावण्यात आली आहे.
दरम्यान, प्रकरण असे आहे की, उच्च न्यायालयाने असे निरीक्षण नोंदवले होते की, मुळशी तालुक्यातील लवासा हे हिल स्टेशन विकसीत करण्यामागे शरद पवार आणि त्यांच्या कुटुंबियांचा हात आहे. पण खंडपिठाने या प्रकरणी हस्तक्षेप करण्यास नकार दिला होता कारण प्रकल्पाचे हक्क तिसऱ्या पक्षाला देण्यात आलेले आहेत.
प्रकल्पाविरोधात जनहित याचिका दाखल करण्यास खुप उशीर झाला होता. याचिका निकाली काढण्यात आली होती. याच निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात जाधव यांनी आव्हान दिलं होतं. याचिकेत नमूद करण्यात आलं आहे की, हिल स्टेशन म्हणून अधिसूचित केलेल्या १८ गावांच्या जमिनी २००२ मध्ये महामंडळाला किरकोळ दराने विकण्यात आल्या आहेत.
अनेक शेतकऱ्यांवर अन्याय झाला आहे. याचिकेत असाही दावा केला गेला आहे की, लवासा प्रकल्प हा महाराष्ट्र प्रादेशिक नगररचना अधिनियम आणि महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास अधिनियमाचे उल्लंघन करून विकसित केला गेला आहे. याचिका निकाली काढताना न्यायालयाने खुपच तांत्रिक कारण दिले होते.
महत्वाच्या बातम्या
हॅलो मी रतन टाटा बोलतोय! एका फोनने बदललं पुण्यातील दोन तरुणांचं आयुष्य, वाचून तुम्हीही कराल कौतुक
आता शिवसेनेने राष्ट्रवादी फोडली! राष्ट्रवादीच्या आमदाराच्या भावाचा शिवसेनेत प्रवेश; उद्धव ठाकरे म्हणाले…
एकनाथ शिंदेंना दिल्लीत शेवटच्या रांगेत स्थान, रोहित पवार संतापले, म्हणाले, मराठी माणसाला..
ईडीविरोधात काँग्रेस रस्त्यावर पण बाकीचे…, शिवसेनेचा राष्ट्रवादीसह मित्रपक्षांनाच सवाल