पुन्हा एकदा राणा दाम्पत्याच्या अडचणींमद्धे वाढ होताना पाहायला मिळत आहे. हनुमान चालिसा पठणाप्रकरणी मुंबई पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले होते. त्यानंतर तुरुंगातून सुटका झाल्यानंतर त्यांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तसेच आता त्यांची प्रकृती ठिक झाल्याने त्यांना डिस्चार्ज मिळाला आहे.
नवनीत राणा यांना रुग्णालयातून डिस्चार्च मिळ्यानंतर त्यांनी केलेल्या वक्तव्यांमुळे त्यांच्यावर कारवाई होणार का अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरु होती.जामिनावर सुटल्यानंतर माध्यमांशी बोलण्यास न्यायालयाने मनाई केली असतानाही राणा दाम्पत्याने वक्तव्ये केली आहेत.
त्यामुळे याबाबत न्यायालयात जाणार असल्याचे सरकारी वकील प्रदीप घरत यांनी म्हटले होतं.सशर्त जामिनावर बाहेर आलेल्या राणा दाम्पत्याने न्यायालयाच्या अटींचे उल्लघन केल्याचा खळबळजनक दावा सरकारी वकील प्रदीप घरत यांनी केला होता. याविरोधात आज न्यायालयात जाणार असल्याचेही त्यांनी म्हटले होतं.
अशातच आता सरकारी वकिलांच्या अर्जाची सत्र न्यायालयाकडून दखल घेण्यात आली असून, तुमचा जामीन का रद्द करू नये ? अशी विचारणा करून न्यायालयाने राणा दाम्पत्याला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. यामुळे आता पुन्हा एकदा राणा दाम्पत्याच्या अडचणींमद्धे वाढ झालेली पाहायला मिळत आहे.
सत्र न्यायालयाने आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा यांना नोटीस बजावली आहे. राणा दाम्पत्याने जामीनाच्या अटींचे उल्लंघन केल्याचा आरोप करत त्यांच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट का जारी करू नये? असा सवाल सत्र न्यायालयाने उपस्थित केला आहे. सोबतच न्यायालयाने राणा दाम्पत्यास १८ मे पर्यंत त्यांची भूमिका स्पष्ट असे सांगितलं आहे.
याबाबत बोलताना सरकारी वकील प्रदीप घरत यांनी म्हंटले होते की, याबाबत बोलताना प्रदीप घरत म्हणाले, “नवनीत राणा आणि रवी राणा यांना न्यायालयाने जी अट घातली होती की, त्यांनी गुन्ह्याशी संबधित कोणत्याही विषयावर माध्यमांसमोर बोलायचे नाही या अटी आणि शर्तीचे उल्लंघन केले आहे.’
‘आम्ही ही बाब न्यायालयाच्या निदर्शनास आणून देऊ. कारण अशा प्रकारची विधाने त्यांनी माध्यमांसमोर केल्यास त्यांना दिलेल्या जामिनाच्या अटीचे उल्लंघन समजण्यात येईल आणि जामीन रद्द समजण्यात येईल असे न्यायालयाने म्हटले आहे,’ असे सरकारी वकील प्रदीप घरत यांनी म्हटले.
महत्त्वाच्या बातम्या
‘मला तो व्हिडिओ द्या’, नवनीत राणांना डिस्चार्ज मिळताच किशोरी पेडणेकर थेट लिलावतीत
‘लॉक अप’ विजेत्या मुनव्वर फारुकीचे ‘मिस्ट्री गर्ल’सोबतचे व्हिडिओ व्हायरल; चाहते म्हणाले, काय चाललंय काय?
सचिनला शेवटच्या ओव्हरमध्ये मॅच जिंकून देणारा ‘तो’ खेळाडू देतोय मृत्यूशी झुंज, किडनी झालीये फेल
यशोगाथा: मुलांनी आईची माया पोहोचवली घराघरात, ‘अम्मा की थाली’ देशात नाही तर जगात प्रसिद्ध