Share

Sanjay Raut : राऊतांनी माध्यमांशी संवाद साधला तर तुमच्या पोटात का दुखतंय? कोर्टाने ईडीच्या वकीलांना झापले

Sanjay Raut

court angry on ed advocate because of sanjay raut  | पत्राचाळ गैरव्यवहारप्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत यांना अटक करण्यात आली आहे. त्याप्रकरणी शुक्रवारी संजय राऊतांच्या जामीन अर्जावर सुनावणी करण्यात आली. मात्र त्या सुनावणीमध्ये ईडीच्या वकीलांनी आपल्याला आणखी युक्तीवाद करायचे असे म्हटले आहे.

त्यानंतर कोर्टाने आता २ नोव्हेंबरपर्यंत सुनावणी स्थगित केली आहे. तसेच राऊतांच्या न्यायालयीन कोठडीमध्ये १५ दिवसांची वाढ झाली आहे. त्यामुळे त्यांची दिवाळी आता कोठडीत जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. आता राऊतांच्या जामीन अर्जावर २ नोव्हेंबरला सुनावणी होणार आहे.

पुढच्या आठवड्यात दिवाळी असल्यामुळे कोर्टाचे नियमित कामकाज हे बंद असणार आहे. त्यामुळे राऊतांची कोठडी दिवाळीत होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. पण यावेळी संजय राऊतांच्या एका वेगळ्याच गोष्टीवर ईडीच्या वकीलांनी आक्षेप घेतला आहे.

संजय राऊतांनी न्यायालयात येण्यापूर्वी माध्यमांशी संवाद साधला होता. त्यावेळी त्यांनी राजकीय वक्तव्ये केली होती. तिथे गर्दी होती. त्यामुळे सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला होता, अशी तक्रार ईडीच्या वकीलांनी केली आहे. पण त्यावर न्यायालयाने ईडीच्या वकीलांनाच सुनावले आहे.

तुमच्या म्हणण्याप्रमाणे हे राजकीय प्रकरण नाही, पण संजय राऊत हे लोकप्रतिनिधी आहे. ते जर न्यायालयाच्या बाहेर माध्यमांशी बोलत असेल, तर तुम्हाला त्यात काय अडचण आहे? असा सवाल न्यायालयाने ईडीच्या वकीलांना विचारला आहे. राऊत मीडियाशी बोलले, तर तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे, तुमच्या पोटात का दुखतंय, असे न्यायालयाने म्हटले आहे.

तसेच ईडीचे वकील त्यावर म्हणाले की, संजय राऊतांनी माध्यमांशी बोलण्यात आमची काहीच हरकत नाही, पण सुरक्षेचा प्रश्न निर्माण होतो. त्यावरही न्यायालयाने ईडीच्या वकीलांना सुनावले आहे. ते म्हणाले की, इथे काय गोळीबार होणार आहे का? तसं असेल तर तुम्ही ते लेखी द्यावे, आम्ही त्यावर निर्णय देऊ. इतर आरोपींना चहा प्यायला नेतात, ते डबा खातात, मग राऊतांनी संवाद साधला तर गैर काय? असेही न्यायालयाने म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या-
Aman Hundal : सिंगापूरहून शिकून आली अन् आता रस्त्याच्या कडेला उघडला ढाबा, महिन्याला कमावते बक्कळ पैसा
…म्हणून दिराने चक्क गरोदर वहिनीसोबत केले लग्न, महीलेचा पती सुद्धा होता लग्नाला हजर
शेतात काम केलं, लोकांची खरकटी भांडी धुतली, आज UPSC मध्ये २१७ रँक मिळवत झाली IPS

ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now