मराठी सिनेसृष्टीतील सर्वांत गोड कपलमध्ये शिवानी रांगोळे आणि विराजस कुलकर्णीचे नाव येते. गेल्या काही दिवसांपूर्वीच या दोघांची रिंग सेरेमनी झाली आहे. त्यामुळे आता शिवानी आणि विराजस कधी लग्नबंधनात अडकतील याची चाहते आतूरतेने वाट पाहत आहेत. अशातच सोशल मिडियावर या दोघांनी लग्न केले असल्याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
त्यामुळे शिवानी आणि विराजसने गुपचुप लग्नगाठ बांधली असल्याची सर्वत्र रंगली आहे. व्हायरल झालेला व्हिडीओ स्वत: शिवानी रांगोळेने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवरुन शेअर केला आहे. यात ति आणि विराजस वधु वराच्या पोषाखात तयार झालेले दिसत आहेत. मुख्य म्हणजे दोघेही या पेहराव्यात खूपच सुंदर दिसत आहेत.
मात्र हा व्हिडीओ पाहून वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले असले तरी शिवानी आणि विराजसने प्रत्यक्षात लग्न केलेले नाही. लग्नाचा पेहराव या दोघांनी एका जाहिरातीच्या शुटसाठी घातला होता. एका ज्वेलरी ब्रॅण्डच्या जाहिरातीमध्ये लवकरच हे दोघे दिसणार आहेत. त्याचीच तयारी करताना हा व्हिडीओ शिवानीने शेअर केला आहे.
सध्या या व्हिडीओला पाहून अनेकांनी शिवानी आणि विराजसला लग्नाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच काहींनी तर यावर नाराजीही व्यक्त केली आहे. परंतु खरच शिवानी आणि विराजस कधी लग्न बंधनात अडकणार याविषयीची चर्चा अद्याप थांबलेली नाही. चाहते या दोघांच्या लग्नाची आतूरतेने वाट पाहत आहेत.
दरम्यान विराजस प्रसिद्ध अभिनेत्री मृणाल कुलकर्णीचा मुलगा आहे. त्याने माझा होशील ना या मालिकेच्या प्रमुख भूमिकेत काम केले आहे. तर शिवानी एक प्रसिध्द अभिनेत्री आहे. तीने मराठी मालिकांसोबत चित्रपटात ही काम केले आहे. नुकतीच ति सांग तु आहेस ना या स्टार प्रवाहाच्या मालिकेत झळकली होती.
सांगण्यात येते की, या दोघांच्या प्रेमाला सुरुवात याच काळात झाली. शिवानी आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवरुन विराजससोबत केलेल्या मस्तीचे फोटो शेअर करत असते. या फोटोंवर चाहते भरभरुन प्रतिक्रिया देताना दिसतात. आता तिने लग्नाचा व्हिडीओ पोस्ट केल्यामुळे चाहते या दोघांचे अभिनंदन करताना दिसत आहेत.
महत्वाच्या बातम्या
हिरो स्प्लेंडरचे इलेक्ट्रिक व्हर्जन होणार लाँच, २४० किमी असेल रेंज; जाणून घ्या फिचर्स अन् किंमत
तुळशीहार गळा कासे पितांबर..! पंतप्रधान मोदी बनले वारकरी; हातात विना अन् डोक्यावर फेटा, फोटो तुफान व्हायरल
ड्रीम बाईक विकत घेण्यासाठी तरुणाने १-१ रुपया जमवला; तीन वर्षांच्या बचतीनंतर शोरुममध्ये गेला अन्…
शरद पवार करणार युपीएचं नेतृत्व; कार्यकारीणीच्या बैठकीत अध्यक्षपदाचा ठराव मंजूर