Share

सोलापूरात विकृत टोळीचा पर्दाफाश, बंदुकीच्या धाकावर लोकांना विवस्त्र करायचे आणि.., वाचून धक्का बसेल

गावठी पिस्तुलाचा तसेच धारदार शस्त्रांचा धाक दाखवून लोकांना नग्न करणाऱ्या, अनैसर्गिक लैंगिक संबंध ठेवायला लावून त्याचे व्हिडिओ रेकॉर्डींग करणाऱ्या आणि त्यांना शेण खाऊ घालणाऱ्या विकृत टोळीला अखेर पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. त्यांच्या अटकेने परिसरातील लोकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.

ही विकृत टोळी सोलापूर येथील आहे. सोलापूरमधल्या जुना तुळजापूर नाका ते रुपभवानी मंदिर या परिसरात ही टोळी आपली विकृत कृत्ये करत होती, तेव्हा पोलिसांनी त्यांना अटक केली. त्यांच्यावर कलम 292, 506(2), भारतीय हत्यार कलम कायदा 3,4,25 तसंच माहिती तंत्रज्ञान अधिनियम 67 (अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अटक करण्यात आलेले सर्वजण 22 ते 26 वयोगटातले आहे. सागर कांबळे, बुद्धभूषण नागटिळक, सतीश गायकवाड आणि अक्षय थोरात अशी अटक करण्यात आलेल्या या विकृत टोळीतील नराधमांची नावं आहेत. टोळीतील इतर जणांचा पोलीस तपास करत आहेत.

ही टोळी गावठी पिस्तुलाचा तसेच धारदार शस्त्रांचा धाक दाखवून लोकांना जीवे मारण्याची धमकी देऊन विवस्त्र करत होती. तसेच लोकांना अनैसर्गिक लैंगिक संबंध ठेवायला लावून त्याचे व्हिडीओ रेकॉर्डही करायची. एवढेच नाही तर, लोकांना शेण खाऊ घालणं, हस्तमैथून करायला लावणं,आणि हे व्हिडिओ शेअर करणं,असे प्रकार करत होती.

लोकांसोबत असे कृत्य करून ही टोळी त्यांना लुटत देखील होती. लोकांना या टोळीचा धाक वाटू लागला होता. अनेक लोक जीव मुठीत ठेवून परिसरात वावरत होते. पोलिसांनी अखेर या विकृत टोळीतील चौघांना अटक केली. चौघांकडून पोलिसांनी गावठी पिस्तूल, धारधार शस्त्रं आणि 4 मोबाईल सह एकूण 2 लाख 20 हजारांचा मुद्देमाल देखील जप्त केला आहे.

टोळीला पकडण्याची कामगिरी मा. पोलीस उप आयुक्त डॉ. वैशाली कडुकर, एसीपी डॉ. संतोष गायकवाड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळासाहेब भालचिम यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथक प्रमुख पोलीस उप निरीक्षक केतन मांजरे, आबा थोरात, सुरेश जमादार, अतुल गवळी, खाजप्पा आरेनवरु  थिटे, राजेश घोडके,  स्वप्निल कसगावडे, इत्यादींनी केली.

क्राईम

Join WhatsApp

Join Now