दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री नयनतारा नुकतीच विवाहबंधनात अडकली असून, दिग्दर्शक विग्नेश शिवन याच्यासोबत तिचा विवाह झाला. यावेळी त्यांच्या लग्नाला अभिनेता शाहरुख खान याने देखील हजेरी लावली. तीन दिवसांपूर्वी शाहरुख खानला कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे त्याची उपस्थिती चर्चेचा विषय ठरला.
चेन्नईतल्या महाबलीपुरम इथं कुटुंबीय आणि मित्रपरिवाराच्या उपस्थितीत काल म्हणजेच ९ जून रोजी नयनतारा आणि विग्नेश शिवन लग्नाच्या बेडीत अडकले. या लग्नसोहळ्याला दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील दिग्गज कलाकार उपस्थित राहणार असल्याचं म्हटलं जात होतं.
विशेष म्हणजे बॉलिवूडचा किंग अर्थात अभिनेता शाहरुख खानला तीन दिवसांपूर्वी कोरोना लागण झाली असताना देखील तो या लग्नाला हजर राहिला. त्यामुळे चर्चेचा विषय ठरला. शाहरुखचे लग्नातील काही फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
माहितीनुसार, ‘जवान’ या चित्रपटात शाहरुख आणि नयनतारा एकत्र काम करणार आहेत. नयनताराच्या लग्नातील शाहरुखचा हा खास लूक सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. दुसरीकडे शाहरुखला तीन दिवसांपूर्वी कोरोना झाला होता, मात्र तो बरा झाला हे पाहून चाहत्यांना आनंद झाला आहे.
शाहरुख अलीकडेच करण जोहरच्या ५० व्या वाढदिवसाच्या पार्टीत सहभागी झाला होता. याच पार्टीत चित्रपटसृष्टीतील अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. या पार्टीतच शाहरुख आणि कतरिनाला कोरोनाची लागन झाली होती. मात्र आता शाहरुख कोरोना मधून लवकर बरा झाला आहे.
माहितीनुसार, मार्च २०२१ मध्ये नयनतारा आणि विग्नेश यांनी साखरपुडा केला. हे दोघं २०१५ पासून एकमेकांना डेट करत आहेत. ‘नानुम राऊडी धान’ या चित्रपटाच्या सेटवर दोघांची पहिल्यांदा भेट झाली होती. नयनताराने २००३ मध्ये चित्रपटसृष्टीतील कारकिर्दीला सुरुवात केली होती.