मुंबई विद्यापीठात नामांतराच्या वादाचा भडका; राज्यपाल म्हणतात सावरकर तर विद्यार्थी शाहू महाराजांवर ठाम

मुंबई विद्यापीठाच्या कलिना कॅम्पसमध्ये आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांची राहण्याची सोय व्हावी म्हणून नवीन वसतिगृह बांधण्यात आला आहे. नुकतीच मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू आणि राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते याचे उद्घाटन झाले. यानंतर या वसतिगृहाच्या नामांतराचा वाद मुंबई विद्यापीठात पेटला आहे. (Controversy over name change erupts in Mumbai University)

या वादाला सुरुवात उद्घाटन समारंभापासून झाली असे म्हणता येईल. राज्यपालांनी सावरकरांचे नाव या वसतिगृहाला द्यावे, असे सूचक वक्तव्य केले. अनेक संघटनांनी मात्र राजर्षी शाहू महाराजांचे नाव या वसतिगृहाला द्यावे, अशी भूमिका घेतली. त्यावरूनच या वादाची ठिणगी पडली आहे.

राज्यपालांनी आपल्या भाषणात म्हंटले की, ‘वीर सावरकरांनी इंग्लंडमध्ये राहत असताना त्यांनी १८५७ चा स्वातंत्र्यसंग्राम लिहिला. तशी तर ही छत्रपती शिवाजी महाराजांची पुण्यभूमी. या ठिकाणी अनेक दिव्य स्त्री-पुरुषांनी जन्म घेतला. परंतु १८५७ ला या विद्यापीठाची स्थापना झाली आहे. त्यामुळे १८५७ चा स्वातंत्र्यसंग्राम लिहिणाऱ्या सावरकरांना इथे जागा देण्यात यावी असे मला वाटते.’

पुढे ते म्हणाले की, ‘तुम्ही आंतरराष्ट्रीय वसतिगृहाला वीर सावरकरांचे नाव दिल्याने या विद्यार्थ्यांना आपल्या देशाचा इतिहास कळेल. आपल्या देशाबाबत त्यांच्या मनात आदर निर्माण होईल.आमचा संकल्प आहे की, आपल्या देशातील विद्यापीठात बाहेरून येणाऱ्या विद्यार्थ्यांना “ही ऋषीमुनींची भूमी आहे, ही स्वामी विवेकानंदांची भूमी आहे,” असं वाटलं पाहिजे.’

मात्र अनेक विद्यार्थी संघटनांनी सावरकरांचे नाव देण्यास विरोध केला. संघटनांचे म्हणणे आहे की, सर्व जाती, धर्मांच्या विद्यार्थ्यांसाठी शाहू महाराजांचे शैक्षणिक कार्य मोठे आहे. त्यामुळे या वसतिगृहाला शाहू महाराजांचे नाव देणे समर्पक ठरेल.

या संबंधी विद्यार्थी संघटनांनी कुलगुरू सुहास पेडणेकर आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्रही लिहिलं आहे. शाहू महाराजांचे नाव वसतिगृहाला देण्यात यावे अशी मागणी एनएसयुआय, छात्र भारती, राष्ट्रवादी काँग्रेस, प्रोग्रेसिव्ह स्टुडंट्स युनियन या विद्यार्थी संघटनांनी केली.

महत्वाच्या बातम्या-
कोहलीपेक्षा वयाने लहान तरीही घेतली क्रिकेटमधून निवृत्ती, म्हणाला, कृपया आजपासून…
बाबा वेंगा यांची तिसरी भविष्यवाणी खरी ठरणार? ‘या’ देशामध्ये दिसले एलियन्स; व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
पूजेसाठी अगरबत्ती पेटवताच गॅस सिलेंडरचा झाला स्फोट; धक्कादायक घटनेचे फोटो व्हायरल