आजकाल चालता चालता हृदयविकाराच्या झटक्याने लोकांच्या मृत्यूचे प्रकरण भयावह वाढले आहे. गेल्या काही दिवसांत अशी अनेक प्रकरणे समोर आली आहेत. आता अशीच एक नवीन घटना हैदराबादमध्ये समोर आली आहे. येथे आसिफ नगर पोलिस स्टेशनमध्ये तैनात असलेल्या कॉन्स्टेबलचा जिममध्ये व्यायाम करताना मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, २४ वर्षीय हवालदार विशाल जीममध्ये व्यायाम करत होता. यादरम्यान तो अचानक खाली पडला आणि काही वेळानेच त्याचा मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी संध्याकाळी घडली असून, विशालला हृदयविकाराचा झटका आल्याचे सांगण्यात येत आहे.
कॉन्स्टेबल विशालने 2020 च्या बॅचमध्ये कॉन्स्टेबल पद मिळवले होते आणि तो आसिफ नगर पोलिस ठाण्यात कार्यरत होता. विशाल सध्या बोईनपल्ली येथे राहत होता. ही संपूर्ण घटना जिममध्ये लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
याआधी उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये जिममध्ये वर्कआउट करत असताना अचानक प्रकृती खालावल्याने डॉक्टरांचा मृत्यू झाला. ही घटना विकास नगर भागातील आहे. 41 वर्षीय डॉक्टर संजीव पाल जिममध्ये वर्कआउट करत होते.
त्यानंतर त्यांची तब्येत बिघडली आणि वर्कआउट करताना ते खाली पडले. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले. पोलिसांनी सांगितले की, संजीव पाल बाराबंकीच्या रुग्णालयात काम करत होते. ते पत्नी आणि दोन मुलींसह विकासनगर येथे राहत होते.
महत्वाच्या बातम्या
‘आले रे आले गद्दार आले’; कसब्यात मुख्यमंत्री शिंदेंच्या रॅलीत त्यांच्याच विरोधात घोषणाबाजी
ठाकरे आता शिंदेसोबत आता मोदींनाही धडा शिकवणार! मातोश्रीवर रचलाय ‘हा’ मास्टर प्लान
संजय राऊतला मारण्यासाठी सुपारी घेतल्याचा आरोप असलेला राजा ठाकूर आहे तरी कोण? जाणून घ्या…