कसबा आणि चिंचवडच्या पोटनिवडणूसाठी महाविकास आघाडी आणि भाजप जोरदार प्रचार करताना दिसून येत आहे. शुक्रवारी कसबा आणि चिंचवडच्या निवडणूकीसाठीच्या प्रचारासाठी शेवटचा दिवस होता. त्यामुळे शुक्रवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रचारासाठी कसब्यात आले होते.
पुणे दौऱ्यावर असताना एकनाथ शिंदे यांच्या रोडशोचे आयोजन करण्यात आले होते. कसब्यात भाजपचा उमेदवार निवडून यावा यासाठी ते प्रचार करत होते. कसब्यात भाजपचे हेमंत रासने विरोधात काँग्रेसचे रवींद्र धंगेकर यांच्यात मुख्य लढत होणार आहे.
एकनाथ शिंदेंनी रोडशो करत असताना त्यांच्या गळ्यात भाजप आणि शिवसेनेचे चिन्ह असलेले उपरणे घातले होते. त्यावेळी एक वेगळाच प्रकार रॅलीत पाहायला मिळाला. आले रे आले रे गद्दार आले रे अशा घोषणाबाजी झाल्याचे पाहायला मिळाले. या सर्व घोषणा एकनाथ शिंदेंच्या विरोधात होत्या.
एकनाथ शिंदें विरोधात ज्याने घोषणाबाजी केली होती. त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पण या गोष्टीची पुण्याच्या राजकारणात चांगलीच चर्चा आहे. एकनाथ शिंदे यांनी हेमंत रासने यांचा शुक्रवारी जोरदार प्रचार केला. पण त्याचवेळी मुख्यमंत्र्यांविरोधात घोषणाबाजी पाहायला मिळाली.
पुण्यातील निवडणूक जिंकण्यासाठी भाजपचे प्रयत्न सुरु आहे. त्यामुळे भाजप आणि शिवसेनेकडून तिथे जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात आले आहे. निवडणूकीसाठी गेल्या काही दिवसांपासून दिग्गज नेते पुण्यातच आहे. भाजप नेते भरत गोगावले, प्रवीण दरेकर हे सुद्धा प्रचारासाठी उपस्थि होते.
कसबा आणि चिंचवड या दोन्ही निवडणूकीचे मतदार २६ फेब्रुवारीला होणार आहे. त्यानंतर २ मार्च रोजी या निवडणूकीचा निकाल लागणार आहे. शेवटचा दिवस असल्यामुळे आदित्य ठाकरे यांनी सुद्धा प्रचारासाठी हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी ५० खोके एकदम ओके अशा घोषणा दिल्या.
महत्वाच्या बातम्या-
ठाकरे आता शिंदेसोबत आता मोदींनाही धडा शिकवणार! मातोश्रीवर रचलाय ‘हा’ मास्टर प्लान
सुप्रीम कोर्टातील सत्तासंघर्षात कुणाची बाजू वरचढ? ठाकरे की शिंदे? उज्ज्वल निकम म्हणाले…
थकलेल्या सलमानला पाहताच चाहते नाराज; म्हणाले आमचा हिरो आता म्हतारा दिसू लागलाय