Share

Kunal Patil : काँग्रेसला सर्वात मोठा धक्का! बडा नेता करणार भाजपात प्रवेश, शेकडो कार्यकर्ते मुंबईच्या दिशेनं रवाना

Kunal Patil

Kunal Patil : राज्यातील विधानसभा निवडणुकीत महायुती (Mahayuti) ला मोठं यश मिळाल्यानंतर महाविकास आघाडीला एकामागून एक धक्के बसताना दिसत आहेत. विशेषतः काँग्रेस (Congress), राष्ट्रवादी काँग्रेस (NCP – Sharad Pawar Group) आणि शिवसेना – उद्धव ठाकरे गट (Shivsena) या तीनही पक्षांमध्ये गळती सुरू आहे.

या पार्श्वभूमीवर आता काँग्रेस पक्षासाठी (Congress Party) आणखी एक मोठा धक्का समोर आला आहे. धुळे (Dhule) जिल्ह्यातील काँग्रेसचे कार्याध्यक्ष आणि माजी आमदार कुणाल पाटील (Kunal Patil) हे उद्या अधिकृतरित्या भारतीय जनता पक्षात (BJP – Bharatiya Janata Party) प्रवेश करणार आहेत.

धुळे तालुक्यातील (Dhule Taluka) शेकडो कार्यकर्ते, ज्यामध्ये जिल्हा परिषद (Zilla Parishad), पंचायत समिती (Panchayat Samiti) सदस्य, सरपंच, उपसरपंच, बाजार समितीचे सभापती आणि संचालकांचा समावेश आहे, हे सर्वजण कुणाल पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुंबई (Mumbai) कडे रवाना झाले आहेत. या सामूहिक प्रवेशामुळे काँग्रेसला धुळे जिल्ह्यात मोठा खिंडार बसला आहे.

काही दिवसांपूर्वी कुणाल पाटील यांनी आपला स्वतंत्र कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला होता. या मेळाव्यात काँग्रेसच्या कोणत्याही प्रमुख नेत्याचे फोटो लावले नव्हते. या मेळाव्यानंतर त्यांनी पक्ष सोडण्याचे संकेत दिले होते. “कार्यकर्त्यांचा विचार करून निर्णय घेईन,” असे त्यांनी स्पष्ट केलं होतं. यामुळे त्यांच्या भाजप प्रवेशाची जोरदार चर्चा सुरू झाली होती. अखेर ती चर्चा आता वास्तवात उतरणार आहे.

कुणाल पाटील यांची धुळे जिल्ह्यात मोठी ताकद आहे, त्यामुळे त्यांचा भाजपमध्ये (BJP) समावेश होण्याने या जिल्ह्यात भाजपाचा बळकटी होईल.  राज्यात पुढील काही महिन्यांत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होण्याची शक्यता असून, त्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा प्रवेश भाजपसाठी (BJP) बळकटीचा आणि काँग्रेससाठी (Congress) धक्कादायक ठरतोय.

ताज्या बातम्या राजकारण

Join WhatsApp

Join Now