Share

मध्यप्रदेशमध्ये ५७ वर्षांनंतर काँग्रेसचा विजय; भाजपला मोठा धक्का

मध्यप्रदेशमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका सुरू आहेत. काही ठिकाणी महानगरपालिकेच्या निवडणुका पार पडल्या आहेत. त्याचा काल पहिल्या टप्प्यातील निकाल लागला आहे. या निकालामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या गेल्या आहेत. काही ठिकाणी भाजपचा पराजय झाला आहे.

मध्यप्रदेशमधील ११ महानगरपालिका, ३६ नगरपालिका आणि ८६ नगरपरिषदेच्या निवडणुका पार पडल्या आहेत. येथील इंदौर, जबलपूर, भोपाळ, सागर, सतना, सिंगरौली, छिंदवाडा, खंडवा, बुरहानपूर आणि उज्जैन या महानगरपालिकेच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या आहेत.

मध्य प्रदेश शहरी संस्थांच्या निवडणुकीत भाजपने पुन्हा एकदा सर्वाधिक जागा जिंकल्या आहेत. राजधानी भोपाळ, उज्जैन, इंदूरसह ७ महापालिकांमध्ये भाजपने महापौरपदावर कब्जा केला आहे. मात्र, ग्वाल्हेरमध्ये भाजपला मोठा धक्का बसला आहे.

ग्वाल्हेरमध्ये काँग्रेसने भाजपचा पराभव केला आहे. माहितीनुसार, येथे ५७ वर्षांनंतर काँग्रेसने विजय मिळवला आहे. काँग्रेसच्या उमेदवार शोभा सिकरवार यांनी भाजपच्या उमेदवार सुमन शर्मा यांच्यावर विजय मिळवला असून, त्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.

याठिकाणी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान व केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी प्रचार केला होता. परंतु, पक्षाला विजय मिळवून देण्यात यश आले नाही. ग्वाल्हेरमध्ये भाजपचा पराभव आणि काँग्रेसच्या विजयामागे सतीश सिकरवार यांची सर्वाधिक चर्चा आहे. कारण, त्यांच्या पत्नी शोभा सिकरवार विजयी झाल्या आहेत.

भाजपमधून काँग्रेसमध्ये प्रवेश करणारे सतीश सिकरवार यांच्या चांगल्या प्रतिमेचा या निवडणुकीत खूप फायदा झाला आहे. त्याचबरोबर भाजपचे जुने नेते व कार्यकर्त्यांना त्यांच्याबद्दल सहानुभूती आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत पक्षाने त्यांना तिकीट न देऊन अन्याय केल्याचे अनेक भाजप समर्थकांचे मत आहे.

राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now