नुकतेच पाच राज्यांच्या निवडणुकीचे निकाल हाती आले आहे. या निवडणुकीमध्ये भाजपला भरघोस यश मिळेले असून कॉंग्रेसला मात्र मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला आहे. काँग्रेसच्या कामगिरीवर अनेक कॉंग्रेसचे बडे नेते आपली भूमिका स्पष्ट करत आहेत.
झालेल्या पराभवानंतर कॉंग्रेसमध्ये नेतृत्वावरुन वाद रंगला आहे. याच पार्श्वभूमीवर काँग्रेसचे जेष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी कॉंग्रेसच्या पराभवाची कारणे सांगितली आहे. ते याबाबत एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते.
गेल्या चार ते पाच वर्षात राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्यासोबत संवाद झाला नसल्याचा खुलासा त्यांनी यावेळी बोलताना केला आहे. तसेच काँग्रेसचं नेतृत्व नव्या पिढीकडे देण्यात चूक झाली असल्याचे सुशीलकुमार शिंदे यांनी सांगितले आहे. पुढे बोलताना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर देखील निशाणा साधला.
याबाबत बोलताना शिंदे म्हणाले, ‘२०१४ नंतर मोदींसारखा आक्रमकपणे प्रचार करणारा मोदींसारखा नेता देशाला मिळाला. त्यामुळे अनेक मोठ्या नेत्यांचा पराभव झाला. मोदींनी सोलापूरातून सैन्यासाठी कपडे घेतले जातील असं सांगितलं होत. मात्र एक ही रुपयाचा कपडा घेतला नाही. खोट्या प्रचाराला लोक भुलले.’
दरम्यान, “गांधी घराण्यात सध्या सोनिया गांधी, राहुल आणि प्रियंका आहेत. त्या घराण्यातून जो विचार येतोय तो काँग्रेसचा आहे. एखाद्या वेळी चूक झाली असेल पण सुधारणा होईल,” असा विश्वास शिंदे यांनी व्यक्त केला. तसेच “तरुणांकडे नेतृत्व द्यायचं, बदल करायला सांगायचं असा प्रयत्न करुन पाहिला आणि तिथेच गफलत झाल्याची कबुली त्यांनी दिली.
तर दुसरीकडे ‘द काश्मीर फाइल्स चित्रपट अजून पाहिलेला नाही. पण हा चित्रपट पाहीन, असे शिंदे म्हणाले. ‘काश्मीरवर चित्रपट काढला असेल, तर ठीक आहे. मात्र, त्याआधी एका राणा नावांच्या लेखकांनी गुजरात फाइल्सवर चांगले लेखन केले असून चित्रपट देखील काढलेला आहे. पंतप्रधान मोदींनी त्याचीही प्रसिद्धी करावी आणि बॅलन्स करावे, अशी खोचक टीका शिंदे यांनी केली.
महत्त्वाच्या बातम्या
..त्यामुळे ठाकरे सरकार तुरुंगातील कैद्यांना देणार तब्बल ५० हजारांचे कर्ज, गृहमंत्र्यांनी दिली माहिती
”पंतप्रधान मोदींनी काश्मीर फाईल्ससारखी गुजरात फाईल्सचीही प्रसिद्धी करावी”
पार्थ पवारांचं नाव घेऊन पोलीस अधिकाऱ्यावर टाकला दबाव, फोन करून म्हणाला, मी आणि पार्थ पवार..
पतीला गोळी मारली, मुलांसमोर रशियन सैनिकांनी महिलेवर केला बलात्कार, युक्रेनच्या नेत्याने सांगितला भयानक किस्सा