गेल्या काही दिवसांपासून शिवसेना नेते एकनाथ शिंदे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर नाराज असल्याचे दिसत होते. पण सोमवारी रात्री ते अचानक नॉट रिचेबल झाले. त्यांनी मोठी बंडखोरी केली असून त्यांच्यासोबत शिवसेनेचे ३५ आमदार असल्याचे म्हटले जात आहे. (congress support eknath shinde)
एकनाथ शिंदे हे सध्या आसाममध्ये आहे. शिंदेंच्या या बंडखोरीमुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. तसेच महाविकास आघाडी सरकार पडण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे. अशात राज्याच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर आली आहे.
काँग्रेसने एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रिपदाला पाठिंबा दिला आहे. एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रिपदाला काँग्रेसचा पुर्णपणे पाठिंबा असल्याचे स्वत: काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीच स्पष्ट केले आहे. एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्यात काहीच हरकत नाही, असे नाना पटोले यांनी म्हटले आहे.
सध्या महाविकास आघाडी सरकार अडचणीत सापडले आहे. या सरकारला वाचवण्यासाठी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी असे तिन्ही पक्ष प्रयत्न करताना दिसून येत आहे. त्यासाठी पक्ष वेगवेगळे निर्णयही घेताना दिसून येत आहे. अशातच आता काँग्रेसनेही एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रिपदाला पाठिंबा दर्शवला आहे.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, सुप्रिया सुळे, जितेंद्र आव्हाड मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या बैठकीसाठी पोहोचले आहे. या बैठकीत एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडखोरीबाबत आणि त्यांच्यासोबत गेलेल्या आमदारांबाबात चर्चा करण्यात येणार आहे.
तसेच सरकार वाचवण्यासाठी एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करा, असं शरद पवार उद्धव ठाकरेंना म्हटले आहे. वर्षा बंगल्यावर सध्या चर्चा सुरू आहे पण शरद पवारांनी उद्धव ठाकरेंना हा सल्ला त्याआधीच फोनवर झालेल्या संभाषणात दिल्याची माहिती समोर आली आहे.