तर आता काँग्रेस खासदाराला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. सध्या निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. अशातच काँग्रेस खासदाराला जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याने अनेकांच्या भुवया उंचवल्या आहेत.
वाचा नेमकं प्रकरण काय..? पंजाबच्या लुधियानाचे काँग्रेस खासदार रवनीत सिंग बिट्टू यांना जीवे मारण्याची धमकी देणारा मेसेज आला आहे. “सिद्धू मुसेवाला सारखेच तुमचे हाल केले जातील” असं मेसेजमध्ये लिहिण्यात आलं आहे. रवनीत सिंग बिट्टू यांनी धमकी मिळाल्याने खळबळ उडाली आहे.
दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी सकाळी रवनीत यांच्या पर्सनल नंबरवर एक कॉल आला होता. धक्कादायक बाब म्हणजे ज्यामध्ये त्यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. याआधी देखील अनेकदा त्यांना धमक्या मिळाल्या होत्या. आता त्यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.
तर दुसरीकडे नुकतीच बॉलिवूडमधून खळबळजनक माहिती समोर आली आहे. अभिनेता सलमान खान याला जीवे मारण्याच्या धमकीचं पत्र त्याच्या सुरक्षा रक्षकाला सापडलं आहे. सलमान खान आणि त्याचे वडील लेखक सलीम खान यांना धमकीचे पत्र मिळाले आहे.
या पत्रात त्यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. त्यामुळे बॉलीवूड आणि पोलीस प्रशासनात खळबळ उडाली आहे. संबंधित पत्र पोलिसांकडे सुपूर्द करण्यात आलं असून वांद्रे पोलिसांनी याबाबत अज्ञाता विरोधात गुन्हा दाखल केल्याची माहिती मिळाली आहे. सध्या तरी या पत्राने बॉलीवूड मध्ये खळबळ उडवून दिली आहे.