राजकीय वर्तुळात घडामोडींना वेग आला आहे. सुरत विमानतळानजीकच्या मेरीएट (जुनी ग्रँण्ट भगवती) हॉटेलमध्ये शिवसेनेचे महाराष्ट्रातील १६ आमदार थांबले आहेत. वेगवेगळ्या नावाने रुम राखीव असलेल्या या हॉटेलमध्ये काँग्रेसचे काही आमदार येणार असल्याची देखील माहिती समोर आली आहे.
कॉंग्रेस नेत्यांसाठीच व्हीआयपी सूट राखीव ठेवण्यात आले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, सुरत येथे गुजरात भाजप अध्यक्ष व खासदार सी.आर.पाटील यांच्यावर राज्यातील सेना व काँग्रेस आमदारांची सोय करण्याची जबाबदारी आहे. त्यानुसार पाटील यांनी चार वेगवेगळ्या हॉटेल्स व रिसोर्टला व्हीआयपी, सूट बुक केले आहेत.
यामुळे आता कॉंग्रेसचे कोणते नेते बंड करण्याच्या तयारीत आहे, ही पाहणे महत्त्वाचे आहे. यावर अद्याप कॉंग्रेसची प्रतिक्रिया आलेली नाहीये. मात्र सध्या महाविकास आघाडी सरकारमध्ये बैठकांचे सत्र सुरू झाले आहे. सध्या राजकीय वर्तुळात घडामोडींना वेग आला आहे.
असच असतानाच एक मोठी बातमी राजकीय वर्तुळातून येत आहे. भाजपने एकनाथ शिंदेंना उपमुख्यमंत्रीपदाची ऑफर दिली असल्याची बातमी समोर येत आहे. यामुळे शिंदेंच्या बंडामागे भाजपचा हात आहे का? असा सवाल आता उपस्थित झाला आहे. यावर अद्याप भाजपकडून प्रतिक्रिया आलेली नाहीये.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून नाराज असलेले शिवसेना नेते एकनाथ शिंदे हे ‘नॉट रिचेबल’ असल्याची माहिती समोर येत आहे. एकनाथ शिंदे यांच्याशी शिवसेनेकडून काल रात्रीपासूनच संपर्क साधण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र अद्याप संपर्क होऊ शकला नाही.
दरम्यान, यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी देखील आपली प्रतिक्रिया दिलेली आहे. विधानपरिषद निवडणुकीत ज्या ११ मतांना भाजपने सुरुंग लावला होता, सुरुवातीला जे ११ आमदार एकनाथ शिंदे यांच्यासोबत होते, ते हेच असल्याची माहिती आहे. यामागे भाजपचीच खेळी असल्याचा आरोप राऊत यांनी केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
शिवसेनेचे ‘हे’ ४ मंत्री आणि १७ आमदार गायब; बंडखोर आमदार आणि मंत्र्यांची नावे झाली उघड
भाजपकडून एकनाथ शिंदेंना उपमुख्यमंत्रीपदाची ऑफर? राजकीय घडामोडींना आला वेग
“शाब्बास एकनाथजी योग्य वेळी योग्य निर्णय घेतलास, नाही तर लवकरच तुझा आनंद दिघे झाला असता”
मुख्यमंत्री आमदारांसोबत बोलत असतानाच एकनाथ शिंदेनी गेम केला, महत्वाची माहिती समोर






