अजूनही आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडी, गाठी – भेटींचे सत्र पाहायला मिळत आहे. अशातच पुन्हा महाराष्ट्रात राजकीय भूकंप होणार असल्याची चिन्हे दिसू लागले आहेत. शिवसेनेनंतर आता महाराष्ट्र काँग्रेसमध्ये भूकंप होणार असल्याच बोललं जातं आहे.
यामुळे आता येणाऱ्या काळात राजकीय समीकरण नेमकी कशी बदलतात? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. नव्या सरकारचा पहिल्या टप्प्यातील मंत्रिमंडळाचा विस्तार झाला असून दुसऱ्या टप्प्यातील विस्तार रखडला आहे. पावसाळी अधिवेशन झाल्यानंतर दुसऱ्या टप्प्यातील विस्तार होणार असल्याचं सांगण्यात येत होतं.
याच पार्श्वभूमीवर आता भाजपकडून काँग्रेसच्या आमदारांचा मोठा गट फोडण्यात येणार असल्याच बोललं जातं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कॉंग्रेसमधीलच दोन आमदारांना मंत्रिपद देणार असल्याच देखील बोललं जातं आहे. येत्या ऑक्टोबर महिन्यात मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता असल्याच बोललं जातं आहे.
दरम्यान, यामुळे आता येणाऱ्या काळात कॉंग्रेसमधील राजकीय भूमिका कशा असणार हे महत्त्वाचे ठरणार आहे. समजा, कॉंग्रेसमधील गट शिंदे गटासोबत गेला तर, त्यांना मंत्रीमंडळात स्थान मिळणार का? हे पाहणे देखील महत्त्वाचे ठरणार आहे. तर आता कॉंग्रेसमधील बड्या नेत्यांच्या भूमिका महत्त्वाच्या ठरणार आहे.
याचबरोबर, माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता नवा राजकीय भूकंप होणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. तर आता सर्वांचे लक्ष कॉंग्रेसच्या भूमिकेकडे लागलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या
उद्धव ठाकरेंच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहणार म्हणणारे माजी खासदार शिंदे गटात सामील
Asia Cup: काय आहे जय शहा आणि तिरंगा वादाचे संपूर्ण सत्य? भारत-पाकिस्तान सामन्यादरम्यान असं काय घडलं?
PHOTO: २९ व्या वर्षी चित्रपटात पदार्पण, १७ वर्षात १० चित्रपट, आता ४६ व्या वर्षी केले बोल्ड फोटोशूट