Share

‘मविआ’मधील नाराजीनाट्य थांबेणा! २५ काँग्रेस आमदार नाराज, अडीच वर्षे वाया गेल्याची भावना

congress

राज्यात तीन वेगळ्या पक्षानी मिळून स्थापन झालेले महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यापासून कोणत्या ना कोणत्या कारणाने सतत चर्चेत आहे. यातीलच एक मुद्दा म्हणजे ठाकरे सरकारमधील नाराजीनाट्य. एकाच सरकारमध्ये काम करत असले तरी अनेक नेते पक्षाला घरचा आहेर देत आहेत, तर अनेक नेते हे आपल्याच सरकारमधील पक्षावर टीका करत आहेत.

हे सांगण्याच कारण म्हणजे पुन्हा एकदा ठाकरे सरकारमधील नाराजीनाट्य समोर आलं आहे. महाविकास आघाडीत सत्तेत असलेल्या काँग्रेसने नाराजी व्यक्त केली आहे. कॉंग्रेसच्या 25हून अधिक आमदारांनी सोनिया गांधींच्या भेटीची वेळ मागितली माहिती समोर आली आहे.

तिन पक्षांचं सरकार असणाऱ्या महाविकास आघाडीतील काँग्रेस आमदारांनी नाराजीचा सूर आवळला आहे. महामंडळ आणि दंडाधिकारी यांच्या नियुक्त्या रखडल्या आहेत, जिल्हा समित्या बनवल्या नाहीत, त्यामुळे अडीच वर्ष वाया गेल्याची भावना आमदारांनी व्यक्त केली आहे.

याचाच धागा पकडत या आमदारांनी थेट सोनिया गांधींच्या भेटेची वेळ मागितली आहे. येत्या तीन तारखेला एका विशेष ट्रेनिंगसाठी ही सर्व मंडळी दिल्लीला पोहोचणार असल्याची माहिती मिळाली आहे. याचबरोबर नाराज काँग्रेस आमदारांचा आकडा हा 25 च्या वरती असल्याच सांगितलं जात आहे.

दरम्यान, यामुळे ठाकरे सरकारमध्ये नेमकं चाललंय तरी काय असा सवाल आता उपस्थित होतं आहे. तसेच कॉंग्रेस आमदारांची नाराजी पक्षाचे जेष्ठ नेते कशी दूर करणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. काही दिवसांपूर्वीच शिवसेनेने थेट राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेसवर तिखट शब्दात निशाणा साधला होता.

सत्तेत सोबत आहात ना? मग आमच्यावर कशाला वार करता? असा सवाल सेनेच्या नेत्याने केला होता. कार्यकर्त्यांना संबोधित करताना शिवसेनेचे आमदार आणि माजी मंत्री तानाजी सावंत यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसवर जहरी टीका केली होती. मागील अडीच वर्षात केवळ अपमान होणार असेल तर साहेबांनी विचार करायला हवा, असा सल्ला त्यांनी दिला होता.

महत्त्वाच्या बातम्या
RRR ची कमाई पाहून सलमान आला टेंशनमध्ये; म्हणाला, बाॅलीवूडचे चित्रपट साऊथमध्ये का चालत नाहीत?
मोहम्मद शमीच्या प्रेमात पडली ‘ही’ अमेरिकन पॉर्नस्टार, म्हणाली, ‘खुप छान कामगिरी केली’
बहुचर्चित ‘RRR’ हा चित्रपट ‘या’ ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार, प्रेक्षकांमध्ये उत्सुकता
‘मला गरिबांच्या पैशातून रस्ते बांधायचे आहेत’, नितीन गडकरींचा मोठा प्लॅन

इतर ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now