Share

ज्ञानवापी मशिद वाद: काँग्रेस नेत्याची सरकारला धमकी, म्हणाला, सरकारने बळजबरी केली तर..

इत्तेहाद मिल्लत कौन्सिलचे प्रमुख आणि काँग्रेस नेते तौकीर रझा यांनी ज्ञानवापी मशीद(Dyanvapi Masjid) वादावर मोठे वक्तव्य केले आहे. त्यांनी दावा केला की, मंदिरे पाडली गेली नाहीत, तर मोठ्या संख्येने धर्मांतरितांनी त्यांची प्रार्थनास्थळे मशिदीत रूपांतरित केली. अशा मशिदींना हात लावू नये, असे ते म्हणाले.(congress-leader-tauqeer-raza-said-mosques-built-temples)

ज्ञानवापी मशिदीच्या सर्वेक्षणावर बोलताना तौकीर रझा(Taukir Raza) यांनी मंगळवारी सांगितले की, ज्ञानवापी मशिदीत जे सापडले त्याला शिवलिंग(Shivling) म्हणणे म्हणजे हिंदुत्वाची थट्टा आहे. देशात अशा अनेक मशिदी आहेत जिथे पूर्वी मंदिरे होती. ही मंदिरे पाडली गेली नाहीत, फक्त जेव्हा लोकांनी इस्लाम स्वीकारला तेव्हाच ती (मशिदीत) बदलली गेली. तौकीर रझा म्हणाले की, मशिदींना हात लावू नये. सरकारने बळजबरीने काही केले तर मुस्लिम सरकारला विरोध करतील.

काँग्रेस नेते पुढे म्हणाले, मुस्लिमांना कायदेशीर लढाई नको आहे कारण त्यांनी बाबरी मशिदीचा निकाल पाहिला आहे. यावेळी आम्ही कोणत्याही न्यायालयात अपील करणार नाही. द्वेष विकणाऱ्यांना देशातील प्रत्येक मशिदीत कारंजे असलेले शिवलिंग सापडेल. त्यांचे चालले तर ते सगळ्यांवर अतिक्रमण करतील. हे लोक कुठे थांबतात हे आम्हाला पहायचे आहे. देशात शांतता राखण्यासाठी मुस्लिमांनी मौन बाळगले आहे.

आला हजरत कुटुंबातील मौलाना तौकीर म्हणाले की, कारंजे आणि शिवलिंग यातील फरक सरकारला समजत नाही. बाबरी मशिदीवर आम्ही संयम बाळगला होता, आता नाही. ज्ञानवापी प्रकरणात बळजबरी केल्यास सरकारला विरोधाला सामोरे जावे लागेल. मोहल्ला सौदागरन(Mohalla Saudagaran) येथील निवासस्थानी पत्रकार परिषदेत मौलाना तौकीर म्हणाले की, हिंदू धर्माची खिल्ली उडवली जात आहे. कारंजे शिवलिंग असल्याचे सांगितले जात आहे.

भारतात दुसरी फाळणी व्हावी, अशी त्यांची इच्छा आहे. तौकीर म्हणाले की, असे शिवलिंग प्रत्येक कुंडात आढळते. अशा प्रकारे सरकारला प्रत्येक मशिदीला मंदिर बनवायचे आहे. त्याचे परिणाम गंभीर असू शकतात. आमची असहायता कमजोरी मानू नका. ते म्हणाले की जामा मशिदीच्या हौजचा फोटो घ्या, नौमहला मशिदीतही दगड आहेत. असे मुद्दे निर्माण करून हिंदू-मुस्लिमांमध्ये गोंधळ घातला जात आहे.

इतर ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now