एकीकडे राजकीय वातावरण तापलं आहे. तर दुसरीकडे राज्यात निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. सर्वच पक्षांनी मोर्चेबांधणीस सुरुवात केली असतानाच कॉंग्रेसच्या गोटातून एक मोठी बातमी समोर येत आहे. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना ईडीने चौकशीसाठी नोटीस बजावली आहे.
‘नॅशनल हेराल्ड’ वर्तमानपत्राशी निगडीत वित्तिय अनियमितता प्रकरणी कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि माजी राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांना समन्स बजावले आहे. यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. यावर अद्याप सोनिया गांधी याचबरोबर राहुल गांधी यांची प्रतिक्रिया आलेली नाहीये.
सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना नॅशनल हेराल्ड वृत्तपत्राशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात चौकशीसाठी समन्स बजावले, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. नुकताच नॅशनल हेराल्ड वृत्तपत्राच्या मालकीच्या पक्ष-प्रचारित यंग इंडियनमधील कथित आर्थिक अनियमिततेच्या चौकशीसाठी हा गुन्हा दाखल करण्यात आला.
याचबरोबर या दोघांनाही 8 जून रोजी चौकशीसाठी हजर राहण्यास ईडीने सांगितले आहे. यावर आता कॉंग्रेस नेत्यांच्या प्रतिक्रिया समोर येत आहेत. याबाबत बोलताना काँग्रेस नेते अभिषेक मनु सिंघवी म्हणाले, ‘सोनिया गांधी स्वतः ईडीच्या कार्यालयात जाऊन सर्व प्रश्नांची उत्तरे देतील.’
दरम्यान, सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना ईडीने चौकशीसाठी नोटीस बजावल्यानंतर तपास यंत्रणेच्या अधिकाऱ्यांनी देखील यावर प्रतिक्रिया दिली आहे. याबाबत बोलताना तपास यंत्रणेचे अधिकारी म्हणतात, ‘मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्याच्या (पीएमएलए) फौजदारी कलमांतर्गत सोनिया आणि राहुल गांधी यांचे जबाब नोंदवायचे असल्याच त्यांनी सांगितलं आहे.’
जाणून घ्या नेमकं प्रकरण काय..? ‘नॅशनल हेराल्ड’ वृत्तपत्राची स्थापना १९३८ मध्ये भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी केली होती. हे वर्तमानपत्र २००८ साली बंद झाले आहे. मात्र, 2012 मध्ये सोनिया आणि राहुल गांधींच्या ‘यंग इंडियन’ नावाच्या कंपनीने ‘असोसिएटेड जर्नल्स लिमिटेड’ कंपनीला केवळ ९० कोटी रूपयांमध्ये खरेदी केले होते.
मात्र, हे सुरू करण्यात आले नव्हते. हे हक्क घेताना 1600 कोटींची संपत्ती फक्त 50 लाखांत घेतल्याचा आरोप भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी केला होता. सोनिया व राहुल यांच्यासह सॅम पित्रोदा आदी सदस्य असलेल्या ‘यंग इंडिया’ या कंपनीच्या माध्यमातून पैशांची अफरातफर झाल्याचा आरोप भाजपचे नेते सुब्रह्मण्यन यांनी केला होता.
महत्त्वाच्या बातम्या
पंतप्रधान नरेंद्र मोदी भारतासाठी देवाचं वरदान आहे; मुख्यमंत्र्यांनी केलं मोदींचं तोंडभरुन कौतूक
VIDEO : तडफडून झाला केके यांचा मृत्यू? वारंवार पित होते पाणी; शेवटच्या क्षणांचा ‘तो’ धक्कादायक व्हिडिओ आला समोर
केकेचा मृत्यू मॉब लिंचिंगसारखाच! चाहत्याने सांगितले ऑडिटोरिअममध्ये नेमकं काय घडलं…
वाढदिवस विशेष: लिलावात कोणीच खरेदी केले नाही, तोच पाटीदार नंतर बनला RCB चा हुकूमी एक्का