गेल्या अनेक दिवसांपासून काँग्रेसचा नवा अध्यक्ष कोण असेल याची चर्चा होत आहे. अशातच एक नवीन माहिती हाती मिळाली आहे. काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि तिरुअनंतपूरमचे खासदार शशी थरूर हे देखील काँग्रेस अध्यक्षपदासाठी निवडणूक लढवण्याची शक्यता असल्याच बोललं जातं आहे.
काँग्रेसचा नवा अध्यक्ष कोण असेल यावरून काँग्रेसच्या दोन गटांमध्ये मतभेद आहेत. गांधी गटाला गांधी घराण्याचाच अध्यक्ष हवा आहे, मात्र असं असलं तरी देखील राहुल गांधी यांची अध्यक्षपद न घेण्याची इच्छा आहे. तर दुसऱ्या गटाला गांधीव्यतिरिक्त दुसरा कोणीतरी नवीन अध्यक्ष हवा आहे.
अशातच आता काँग्रेसचे वरिष्ठ नेते शशी थरुर हे रणशिंग फुंकणार असल्याची माहिती मिळत आहे. असं असलं तरी देखील अद्याप शशी थरूर यांनी निवडणूक लढवण्याबद्दल कोणताही ठोस निर्णय घेतला नसल्याच बोललं जातं आहे. लवकरच यावर निर्णय घेऊ शकतात, असं सांगितलं जातं आहे.
खुद्द शशी थरुर यांनी यावर बोलण्यास स्पष्ट नकार दिला आहे. तर दुसरीकडे, शशी थरूर यांच्यासह मनीष तिवारी आणि पृथ्वीराज चव्हाण यांचीही नावं या निवडणुकीसाठी चर्चेत असल्याच बोललं जातं आहे. यामुळे काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या रिंगणात हे दोन नेतेही उतरण्याची शक्यता आहे.
दरम्यान, 17 ऑक्टोबरला काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, 22 सप्टेंबर रोजी निवडणुकीची अधिसूचना जारी होणार आहे. 24 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर या कालावधीत अध्यक्षपदासाठी अर्ज भरण्यात येणार आहेत. विशेष बाब म्हणजे, काँग्रेस अध्यक्षपदासाठी होणारी ही खुली निवडणूक आहे.
महत्त्वाच्या बातम्या
PHOTO: साऊथच्या दिपीका पदुकोणने बेडरूममध्ये दिली किलर पोज, फोटो पाहून नेटकरी घायाळ
धक्कादायक; लिंगायत संतांचा दोन अल्पवयीन मुलींवर बलात्कार, आंदोलन पेटलं
T.V. Star: ‘या’ अभिनेत्रीला होते सेक्सचे व्यसन, ७०० पुरूषांसोबत बनवले संबंध, स्वत:च खुलासा करत म्हणाली..
Prime Minister: ‘तो’ शब्द ऋषी सुनक यांना पडलं महागात, पंतप्रधान शर्यतीत पडले मागे, आपल्याच पायावर मारली कुऱ्हाड