Share

हिंगोलीत काँग्रेसला खिंडार, जिल्हाध्यक्षानेच शिवसेनेत केला प्रवेश, समर्थकांनीही भगवा घेतला हाती

राज्यात सध्या महाविकास आघाडीचे सरकार आहे. सरकारमध्ये तीन पक्ष असल्यामुळे अनेकदा महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये कुरबुर सुरु असल्याचे समोर येत असते. पण हे सरकार पुर्ण पाच वर्षे चालेल असा पक्षांचे प्रमुख दावा करताना दिसून येतात. (congress leader leave party and join shivsena)

अशात स्थानिक पातळीवर मात्र तिन्ही पक्षांमध्ये तणावाचे वातावरण असल्याचे दिसून येते. तसेच ते एकमेंकावर कुरघोडीही करताना दिसून येतात. आता अशीच एक बातमी समोर आली आहे. हिंगोलीच्या काँग्रेस जिल्हाध्यक्षानेच शिवसेनेचा झेंडा आता हाती घेतला आहे.

मुंबईत राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत संजय बोंढारे आणि त्यांच्या समर्थकांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. यामुळे स्थानिक पातळीवरील काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. तसेच या प्रवेशाने बाळापुरसह तिथल्या परीसरामध्ये शिवसेनेची ताकद वाढणार आहे.

संजय बोंढारे यांनी राजकारणातून उतरुन आपल्या कार्यकाळात सभापती ते जिल्हा परीषद शिक्षण सभापती असा प्रवास असा केला. तसेच संजय बोंढारे यांचे आखाडा बाळापूर शहरावर वर्चस्व आहे. ग्रामपंचायत, कृषी उत्पन्न बाजार समिती असो की इतर सोसायटी यांच्यावर त्यांचा ताबा राहिलेला आहे.

माजी खासदार शिवाजी माने यांच्यासोबत मिळुन त्यांनी शिवसेना सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर झालेल्या जिल्हा परीषद निवडणूकीमध्ये त्यांनी बाळापूर सर्कलमधून निवडून येत विजय मिळवला होता. जिल्हा परीषदेवर काँग्रेसने सत्ता मिळवल्यानंतर शिक्षण व अर्ध सभापती हे अत्यंत महत्वाचे पद त्यांना मिळाले होते.

संजय बोंढारे यांची खासदार राजीव सातव यांचे निष्ठांवत म्हणुन ओळख आहे. पण सातव यांचे अकाली निधन झाले. त्यामुळे काँग्रेस पक्षात मन रमत नसल्याने आणि गटबाजीमुळे अखेर त्यांनी जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. पण त्यांचा हा राजीनामा प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यानी स्वीकारला नाही. पण त्यानंतर आता त्यांनी थेट शिवसेनेत प्रवेश केला आहे.

महत्वाच्या बातम्या-
राज ठाकरेंच्या ताफ्यातील गाड्यांचा अपघात; गाडीत होते ‘हे’ मराठी अभिनेते
नेतेमंडळींवर हजारोंचा वाहतूक दंड, चंद्रकांत पाटील म्हणाले घरंदारं विकायची वेळ येईल
“त्याला सांगा नीट राहायला, नाहीतर…”, शर्मिलांनी सांगितला राज ठाकरेंना दुबईहून आलेल्या धमकीच्या फोनचा किस्सा

ताज्या बातम्या राजकारण

Join WhatsApp

Join Now