फडणवीसांची भेट घेतल्यानंतर अशोक चव्हाण थेट दिल्ली दरबारी; कॉंग्रेसच्या गोटात खळबळ, राजकीय समीकरण बदलणार

राजकीय वर्तुळात घडामोडींना प्रचंड वेग आला आहे. माजी मुख्यमंत्री, काँग्रेसचे मराठवाड्यातील नेते अशोक चव्हाण यांनी नुकतीच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याची माहिती समोर आली. आणि राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली. यामुळे राजकीय वर्तुळातील अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

चव्हाण – फडणवीस यांच्या भेटीनंतर आता राज्यात मोठा राजकीय भूकंप होणार असल्याच्या चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. शिवसेनेनंतर आता महाराष्ट्र काँग्रेसमध्ये भूकंप होणार असल्याच बोललं जातं आहे. अशातच आणखी एक महत्त्वाची बातमी समोर येतं आहे.

रविवारी दिल्लीत होणाऱ्या काँग्रेसच्या मोर्चासाठी आज राजधानीत जाणार असल्याचेही चव्हाण यांनी स्पष्ट सांगितलं आहे. फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर लगेच चव्हाण यांनी दिल्ली दौऱ्याची घोषणा केल्याने अनेकांच्या भुवया उंचवल्या आहेत. फडणवीस यांच्या भेटीबद्दल खुद्द चव्हाण यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

याबाबत माध्यमांशी बोलताना चव्हाण यांनी म्हंटलं आहे की, मी भाजप आणि शिंदे गटामध्ये समन्वयासाठी नियुक्त केलेल्या आशिष कुलकर्णी यांच्या घरच्या गणपतीसाठी गेलो होता. त्यावेळी तेथे माझी आणि फडणवीसांची उभ्या-उभ्या भेट झाल्याचे झाली, असल्याच त्यांनी स्पष्ट केलं.

दरम्यान, या भेटीदरम्यान कोणतीही राजकीय चर्चा झाली नसल्याचेही चव्हाण यांनी यावेळी बोलताना नमूद केलं.  नव्या सरकारचा पहिल्या टप्प्यातील मंत्रिमंडळाचा विस्तार झाला असून दुसऱ्या टप्प्यातील विस्तार रखडला आहे. पावसाळी अधिवेशन झाल्यानंतर दुसऱ्या टप्प्यातील विस्तार होणार असल्याचं सांगण्यात येत होतं.

याच पार्श्वभूमीवर आता भाजपकडून काँग्रेसच्या आमदारांचा मोठा गट फोडण्यात येणार असल्याच बोललं जातं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कॉंग्रेसमधीलच दोन आमदारांना मंत्रिपद देणार असल्याच देखील बोललं जातं आहे. येत्या ऑक्टोबर महिन्यात मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता असल्याच बोललं जातं आहे.

महत्त्वाच्या बातम्या