गेल्या काही दिवसांपासून राज्यात महाविकास आघाडीतील काही आमदार नाराज असल्याच्या बातम्या येत आहेत. राज्यात भाजपला डावलून महाविकास आघाडी सरकारचे (Mahavikas Aghadi government) स्थापन झाल्यानंतर अंतर्गत वाद चव्हाट्यावर येत आहेत. आरोप-प्रत्त्युर पाहायला मिळत आहे.
अनेकदा महाविकास आघाडीत सत्तेत असलेल्या काँग्रेसने नाराजी व्यक्त केली आहे. तर आता कॉंग्रेस मोठं पाऊल उचणार असल्याच बोललं जातं आहे. यामुळे महाविकास आघाडी सरकारमध्ये बिघाडी होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात वर्तवली जातं आहे. आज याबाबत अखेरचा निर्णय होणार आहे.
आज दिल्ली दरबारी कॉंग्रेस हायकमांडकडून निर्णय होणार असल्याची माहिती मिळत आहे. यासाठी काँग्रेस हायकमांडने आज राज्यातील प्रमुख मंत्र्यांना तातडीने दिल्लीत बोलवून घेतले आहे. त्यामुळे राजकीय दृष्ट्या आजचा दिवस अतिशय महत्त्वाचा असणार आहे.
काँग्रेस हायकमांडने घेतलेल्या आजच्या निर्णयावरच महाविकास आघाडी मध्ये काँग्रेस राहणार की जाणार? हे ठरणार आहे. काही दिवसांपासून राष्ट्रवादीने काँग्रेसची कोंडी केल्याचे दिसत आहे. अलीकडेच काँग्रेसचे नगरसेवक फोडल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादीवर करण्यात आला होता.
दरम्यान, काँग्रेसच्या विषयाबाबत दोन्ही मित्र पक्षांकडून अपेक्षित साथ मिळात नसल्याचे अनेकदा कॉंग्रेस नेत्यांनी सांगितले आहे. राज्यात राज्य सरकारमध्ये असूनही काँग्रेसला मिळत असलेली दुय्यम वागणूक विषयी देखील अनेकदा कॉंग्रेस नेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
आज यावर अखेरचा फैसला होणार आहे. महाविकास आघाडीमधून काँग्रेस बाहेर पडली तर शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेसची पुढील राजकीय भूमिका काय असणार? याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. याचबरोबर कॉंग्रेस नेते काय पाऊले उचणार? याकडे देखील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
पांड्याची हवा! गुजरात टायटन्सने पदार्पणातच कमावले कोट्यवधी, पहा कोणाला कोणतं बक्षीस मिळालं
मोठी बातमी! शेतकरी नेते राकेश टिकेत यांच्यावर पत्रकार परिषदेत शाईफेक, कार्यक्रमात गदारोळ
लग्नाच्या 30 वर्षांनंतर दोघांतील नात्यावर बोलली अर्चना पूरणसिंह; म्हणाली, वयातील फरकामुळे…
गुजरातने राजस्थानला हरवून पदार्पणातच पटकावले आयपीएलचे विजेतेपद; हार्दीकने करून दाखवलं..






