Share

“मोदींनी ज्या रेल्वे स्टेशनवरती चहा विकला ते सुद्धा काँग्रेसने बांधलेय”

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा आणि राज्यसभेत काँग्रेसवर सडकून टीका केली होती. त्यांनी लता मंगेशकर यांच्यापासून ते महागाईपर्यंत विविध मुद्यांवरून काँग्रेसवर घणाघाती टीका केली होती. याला आता काँग्रेसचे जेष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी प्रतिउत्तर देत मोदींना खोचक टोला लगावला आहे.

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अभिभाषणाच्या धन्यवाद प्रस्तावावर झालेल्या चर्चेला उत्तर देताना मोदींनी काँग्रेसच्या अपयशाचा पाढा वाचला. काँग्रेसवर त्यांनी सडकून टीका केली. नरेंद्र मोदी यांनी इंदिरा गांधींच्या काळात लागलेल्या आणीबाणीपासून महिलांवर झालेले अत्याचार, मुलभूत सुविधांची टंचाई आदी विषयांना हात घातला.

तसेच ,काँग्रेस नसती तर लोकशाही घराणेशाहीमुक्त असती. देश विदेशीऐवजी स्वदेशीच्या मार्गावर गेला असता. काँग्रेस नसती तर आणीबाणीचा कलंक आपल्या देशावर लागला नसता. काँग्रेस नसती तर अनेक दशके संस्थागत भ्रष्टाचार चालला नसता. काँग्रेस नसता तर जातीवाद आणि प्रादेशिकवादाची दरी एवढी खोल नसती.असे अनेक मुद्दे घेऊन मोदींनी काँग्रेसवर टीका केली होती.

काँग्रेसवर मोदींनी एवढी टीका केल्यानंतर आता मोदींना प्रतिउत्तर देताना काँग्रेसचे जेष्ठ नेते कपिल सिब्बल म्हणाले, “गोवा, उत्तर प्रदेश,उत्तराखंड, पंजाब या राज्यांमध्ये निवडणूक होत आहे. त्यामुळे मोदींनी निवडणुकीच्या मैदानातील भाषण केलं आहे. मला देखील मोदींना इतिहास समजावून सांगायचा आहे.”

म्हणाले, “आयआयटी आणि आयआयएम या संस्था मोदींनी नाही,तर काँग्रेसने निर्माण केल्या होत्या. मोदी ज्या रेल्वे स्टेशनवर चहा विकत होते ते रेल्वे स्टेशन देखील काँग्रेसने तयार केलं होतं. जर काँग्रेसने ते स्टेशन तयारच केलं नसतं तर मोदींनी चहा कसा विकला असता.” अशी खोचक टीका कपिल सिब्बल यांनी केली.

दरम्यान, काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी देखील मोदींवर निशाणा साधला. म्हणाले, “संसद हे कायदेमंडळ आहे, तो राजकीय सभेचा आखाडा नाही. बहुदा पंतप्रधान हे विसरले असावेत. पाच राज्यातील निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून पंतप्रधानांनी मतांची गोळाबेरीज करण्याचा प्रयत्न केला आहे.”

तसेच म्हणाले, “आपल्या 60 मिनिटांच्या भाषणात पंतप्रधान मोदींनी किमान 50 वेळा तरी काँग्रेसचा गजर करून एका अर्थाने काँग्रेसचाच प्रचार केला आहे. खोटा इतिहास सांगून मते मिळविण्याचा पंतप्रधानांचा हा केविलवाणा प्रयत्न होता,” अशी टीका बाळासाहेब थोरात यांनी केली.

राजकारण

Join WhatsApp

Join Now