Congress : श्रीरामपूर मतदारसंघ, जो काँग्रेसचा(Congress) पारंपरिक बालेकिल्ला मानला जातो, तिथे काँग्रेसला मोठा हादरा बसला आहे. काँग्रेसचे माजी नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष आणि १० माजी नगरसेवकांनी पक्षाला रामराम ठोकत थेट भाजपमध्ये प्रवेश केला आहे. या घडामोडींमुळे काँग्रेसचे आमदार हेमंत ओगले(Hemant Ogle) आणि नेते करण ससाणे(Karan Sasane,) यांना मोठा धक्का बसला आहे.
१५ एप्रिल रोजी मुंबईतील भाजप प्रदेश कार्यालयात महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे(Chandrashekhar Bawankule), प्रदेश कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण(Ravindra Chavan) आणि जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील(Radhakrishna Vikhe Patil) यांच्या उपस्थितीत या नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. प्रवेश करणाऱ्यांमध्ये माजी नगराध्यक्ष संजय फंड, माजी उपनगराध्यक्ष श्रीनिवास बिहाणी, तसेच अशिष धनवटे, शशांक रासकर, शामलिंग शिंदे, कैलास दुबय्या, मनोज लबडे, राजेंद्र आदिक, संजय गांगड आणि सोमनाथ गांगड यांचा समावेश आहे.
या घडामोडीमागे विखे पाटील कुटुंबीयांची रणनीती असल्याचे बोलले जात आहे. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी श्रीरामपूरमधील काँग्रेसमध्ये फूट पाडून भाजपची पकड मजबूत करण्यासाठी विशेष प्रयत्न केले. ससाणे गटात गेल्या काही वर्षांपासून पक्ष बदलाची चर्चा सुरू होती, मात्र एकमत न झाल्यामुळे निर्णय लांबणीवर पडत होता.
अखेर स्थानिक आणि राज्यस्तरीय राजकीय स्थितीचा अंदाज घेत या नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले जाते. श्रीरामपूरमधील ही राजकीय उलथापालथ भाजपसाठी मोठा टर्निंग पॉइंट ठरू शकते, तर काँग्रेससाठी हा सावधगिरीचा इशारा आहे.
congress-faces-huge-challenges-in-the-fort-itself