Share

congress : महाराष्ट्राचा आणखी एक प्रोजेक्ट गुजरातने पळवला; शिंदे – फडणवीस सरकारवर टीकेची झोड

Eknath Shinde Devendra Fadanvis

congress : राज्यात शिंदे – फडणवीस सरकार स्थापन झाल्यापासून या सरकारने अनेक मोठं – मोठे निर्णय घेतले आहे. या सरकारने असे काही निर्णय घेतले आहेत की, सरकारवर टीकांचा भडिमार झाला आहे. शिंदे – फडणवीस सरकार स्थापन झाल्यापासून अनेक मोठं – मोठे प्रकल्प महाराष्ट्राबाहेर नेण्यात आले आहेत.

काही दिवसांपूर्वीच वेदांता – फॉक्सकॉन हा प्रकल्प गुजरातला पाठविण्यात आला. त्यानंतर शिंदे – फडणवीस सरकारवर विरोधकांनी अनेक टीका केली. याच मुद्यावरवरून राजकारण देखील रंगलं. हे प्रकरण ताजे असतानाच आता आणखी एक मोठा प्रकल्प महाराष्ट्रातून बाहेर गेला आहे.

फॉक्सकॉन, बल्क ड्रग पार्कनंतर आता सी-२९५ या मालवाहू विमानांची बांधणी करणारा ‘टाटा एयरबस प्रकल्प’ महाराष्ट्रातून गुजरातमध्ये गेला आहे. तब्बल 22 हजार कोटींचा हा एअरक्राफ्ट प्रकल्पही गुजरातला गेल्याने शिंदे-फडणवीस सरकारवर टीका होत आहे.

तर दुसरीकडे राष्ट्रवादीकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली आहे. महाराष्ट्रातून मेगा प्रकल्प गुजरातला हस्तांतरीत करण्यासाठीच भाजपने शिंदेना मुख्यमंत्री पदावर बसवले आहे, असा खळबळजनक राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते महेश तपासे यांनी केला आहे.

ट्विट करत तपासे यांनी म्हंटलं आहे की, ‘वेदांत फॉक्सकॉनमधून बाहेर पडल्यानंतर सी-295 लष्करी ट्रान्सपोर्ट एअरक्राफ्ट तयार करण्याचा टाटा एअरबसचा प्रकल्प नागपुरात येईल, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले होते. मात्र शिंदे यांची खोटी भूमिका आता सर्वांसमोर उघडी पडली असल्याच तपासे यांनी म्हंटलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकल्पाचे गुजरातमध्ये 30 ऑक्टोबरला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. काही दिवसांपूर्वी राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी 22 हजार कोटींचा हा प्रकल्प नागपूरला होणार असल्याचे सांगितले होते. आता याच मुद्यावरून राजकारण तापलं आहे.

महत्वाच्या बातम्या  
bjp : टाईमपास’फेम दगडू गेला भाजपच्या मुरजी पटेलांच्या रॅलीत, म्हणाला, “माझ्या घरात गटाराचं पाणी… 
Timepass 3: टाईमपास ३ चा बाॅक्स ऑफीसवर जोरदार धडाका; ३ दिवसांत केली तब्बल ‘एवढ्या’ कोटींची कमाई 
आईबाबा आणि साईबाबाची शप्पथ; टाईमपास ३ चा टीझर रिलीज, हृताचा राऊडी लूक आला समोर 
आपल्या दोस्ताला जो नडेल त्याचा आपण; टाईमपास ३ मध्ये राऊडी लूकमध्ये दिसणार हृता, पहा टीझर
इतर ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now