congress : सर्वच राज्यांमध्ये निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. अवघ्या देशाचे लक्ष्य गुजरात विधानसभा निवडणुकीकडे लागलं आहे. गुजरातमध्ये सध्या राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांकडून मोर्चेबांधणीचे काम सुरू आहे.
गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी आम आदमी पक्षही मैदानात उतरल्यामुळे यंदा तिहेरी लढत होणार असल्याच राजकीय वर्तुळात बोललं जातं आहे. यामुळे यंदाची निवडणूक चांगलीच रंगणार असल्याची चिन्ह दिसतं आहेत. मात्र, असं असलं तरी देखील भाजपला रोखण्यासाठी काँग्रेसने कंबर कसली आहे.
कॉंग्रेस नेत्यांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली असून जोमाने प्रचार सुरू केला आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घोषणांचा पाऊस पाडला जातं आहे. खर्गे यांनी गुजरातमधील जनतेसाठीचा जाहीरनामाच ट्विटर अकाऊंटवरुन शेअर केला आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी मोठी घोषणा केली आहे.
खर्गे यांनी म्हंटलं की, यंदा होणाऱ्या गुजरात विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचं सरकार आलं, तर राज्यातील नागरिकांना ५०० रुपयांत एलपीजी सिलेंडर देणार असल्याची मोठी घोषणा खर्गे यांनी केली आहे. एवढंच नाही तर, ३०० युनीटपर्यंतचे वीजबील, १० लाख रुपयांपर्यंत उपचार आणि औषधेही मोफत देण्यात येणार आहेत.
दरम्यान, गुजरात राज्यातील 182 मतदार संघांसाठी एकूण दोन टप्प्यात मतदान होणार आहे. याचबरोबर पहिल्या टप्प्यातील मतदान 1 डिसेंबर मतदान होणार आहे. तर दुसऱ्या टप्प्यातील मतदान 5 डिसेंबर रोजी होईल. 8 डिसेंबर रोजी अंतिम निकाल जाहीर होणार आहे.
याच पार्श्वभूमीवर आता गुजरातमधील राजकारण तापले आहे. आपने यंदा या निवडणुकीत उडी घेतल्याने ही निवडणूक आणखीनच रंगात आली असल्याच पाहायला मिळत आहे. अशाच कॉंग्रेसने देखील या निवडणुकीसाठी चांगलीच कंबर कसली असल्याच पाहायला मिळत आहे.
Indian Team : पाकिस्तानच्या विजयाने भारताचं टेंशन वाढलं, सेमी फायनलमध्ये जाण्यासाठी उरलाय फक्त ‘हा’ एकमेव मार्ग
Vaishali Suryavashi : खबरदार! यापुढे माझ्या वडीलांचा फोटो लावला तर…; शिंदेगटातील आमदारावर बहीण भडकली
Team India : ‘हे’ पाच खेळाडू ठरलेत टीम इंडियाच्या विजयाचे हिरो; भन्नाट खेळी खेळत राखली संघाची लाज