Share

ईव्हीएममध्ये छेडछाड केल्याचा काँग्रेसचा आरोप, दिल्लीत कार्यकर्त्यांचे आंदोलन

delhi-evm.

पाच राज्यांच्या विधानसभेच्या निवडणुकांचे निकाल आज जाहीर होणार आहेत. या निवडणुकांचे निकाल हाती येऊ लागले आहेत.उत्तर प्रदेश(Uttar Pradesh) राज्यात भाजप आघाडीवर असून काँग्रेस(Congress) पक्ष पिछाडीवर पडला आहे. त्यामुळे उत्तर प्रदेशमध्ये भाजपचीच(BJP) सत्ता येणार हे जवळपास निश्चित झालं आहे. यामुळे काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे.(congress allegation on evm machine)

गोव्यासह इतर राज्यांमध्ये सुद्धा अशीच परिस्थिती आहे. गोव्यात भाजप १९ जागांवर आघाडीवर असून काँग्रेस १० जागांवर आघाडीवर आहे. गोव्यात भाजपने अपक्षांना सोबत घेऊन सरकार स्थापन करण्याचा दावा केला आहे. यादरम्यान काँग्रेस कार्यकर्त्यांनी ईव्हीएम मशीनमध्ये छेडछाड झाल्याचा आरोप करत निदर्शने केली आहेत.

दिल्लीतील काँग्रेस पक्षाच्या कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांकडून ईव्हीएमचा निषेध करण्यात येत आहे. कार्यकर्ते ईव्हीएमचा निषेध करण्यासाठी रस्त्यावर उतरले आहेत. ईव्हीएमचा निषेध करणारे बॅनर हाती घेत काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आंदोलन करत आहेत. ‘ईव्हीएममुळे देशात लोकशाहीची हत्या होत आहे’, असं या बॅनरवर लिहिण्यात आलं आहे.

पंजाबमध्ये एकूण ११७ विधानसभा जागांसाठी मतदानाची प्रक्रिया पार पडली आहे. पंजाबमध्ये आम आदमी पक्षाने काँग्रेसला जोरदार धक्का दिला आहे. आम आदमी पक्ष पंजाबमध्ये बहुमताच्या दिशेने आगेकूच करताना दिसत आहे. आम आदमी पक्षाने पंजाबमध्ये ९१ जागांवर आघाडी घेतली आहे. तर काँग्रेसने १७ आणि अकाली दलाने ६ जागांवर आघाडी घेतली आहे. त्यामुळे पंजाबमध्ये आपला बहूमत मिळण्याची शक्यता आहे.

पंजाबमध्ये भाजपच्या हाती अपयश आले आहे. भाजपने पंजाबमध्ये फक्त २ जागांवर आघाडी मिळवली आहे. उत्तर प्रदेशमधील ४०३ जागांचे कल हाती आले आहेत. यामध्ये भाजप २६३ जागांसह आघाडीवर आहे. तर समाजवादी पक्ष १३५ जागांवर आघाडीवर आहे. बसपा २ जागांवर आघाडीवर आहे. तर इतर पक्ष २ जागांवर आघाडीवर आहेत. उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेस फक्त १ जागेवर आघाडीवर आहे.

मणिपूरमध्ये ६० जागांसाठी दोन टप्प्यात मतदानाची प्रक्रिया पार पडली होती. या ठिकाणी भाजप आणि काँग्रेसमध्ये जोरदार लढत झाली होती. मणिपूरमध्ये भाजपाने तब्बल २५ जागांवर आघाडी घेतली आहे. तर काँग्रेसने १३ जागांवर आघाडी घेतली आहे. मणिपूरमध्ये एनपीएफने ६ जागांवर आणि एनपीपीने १० जागांवर आघाडी घेतली आहे. इतर पक्षांनी ६ जागांवर आघाडी घेतली आहे.

महत्वाच्या बातम्या :-
PHOTO: एक लाजरा न साजरा मुखडा…; लाल रंगाच्या साडीत खुलुन आलं पाठकबाईंचं सौंदर्य, चाहते घायाळ
एलियनच्या प्रेमात वेडी झाली तरूणी; म्हणाली, ‘परग्रहावरून प्रायवेट फोटो पाठवतो’, लव्हस्टोरी वाचून अवाक व्हाल
युपीत ६० जागा लढवणाऱ्या शिवसेनेला किती मते मिळाली? वाचून बसेल धक्का

ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now