अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी चौथ्यांदा देशाचा सर्वसाधारण अर्थसंकल्प (आर्थिक वर्ष 2022-23) सादर केला. अर्थसंकल्पात केलेल्या घोषणांनंतर जिथे शेअर बाजार वेगाने धावताना दिसला, तिथे विरोधी पक्षांना या अर्थसंकल्पात विशेष काही दिसले नाही. काँग्रेस नेते राहुल गांधी आणि ममता बॅनर्जी यांनी या अर्थसंकल्पावर सडकून टीका केली आहे.
यावेळी बोलताना राहुल गांधी म्हणाले, “देशातल्या 55 कोटी लोकांकडे जेवढी संपत्ती आहे त्यापेक्षा जास्त संपत्ती ही अदानी आणि अंबानींकडे आहे, देशातील उद्योगांमध्ये एकाधिकारशाही तयार होऊन ते सर्व अदानी-अंबानींच्या हाती देण्याचं काम मोदी सरकारने केलं आहे.”
संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात राष्ट्रपतींच्या अभिभाषण धन्यवाद प्रस्तावावर ते याबाबत बोलत होते. यावेळी बोलताना राहुल गांधी म्हणतात, “सन 2020 मध्ये देशातील तीन कोटी युवकांनी आपला रोजगार गमावला. गेल्या 50 वर्षातील ही आकडेवारी सर्वात मोठी आहे.”
तसेच भारतातील ४० टक्के संपती मुठभरांच्या हाती एकवटली आहे. ८४ टक्के भारतीयांची कमाई कमी झाली आहे. त्यामुळे गरिबीच्या दिशेने ते ढकलले जात आहेत. देशातील असंघटित कामगार क्षेत्र उद्ध्वस्त करण्याचे काम मोदी सरकारने केल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे.
दरम्यान, पुढे बोलताना राहुल गांधी यांनी बेरोजगारीबाबत मोदी सरकारवर निशाणा साधला. याबाबत बोलताना ते म्हणाले, गेल्या वर्षी देशातील तीन कोटी युवक बेकार झाले. ते सध्या रोजगाराच्या शोधात आहे. मात्र त्यांच्या हाताला मोदी सरकारने काम मिळवून दिलेले नाही. त्याऐवजी नरेंद्र मोदी मेक इन इंडिया, स्टार्ट-अपबद्दलच भाषणे देतात.’
तर दुसरीकडे गेली दोन वर्षे देशावर कोरोनाचं संकट होतं. पण तरीही प्रत्येकाच्या घरात लक्ष्मी आली. प्रत्येक घराची आर्थिक परिस्थिती सुधारली, असा दावा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केला आहे. निर्मला सितरामन यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पावर आता सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप – प्रत्यारोपांचे सत्र सुरू झाले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
budget 2022: मोबाईल फोन चार्जरसोबत या गोष्टी झाल्या स्वस्त, वाचा कोणत्या वस्तू झाल्यात महाग..
Budget 2022: सोप्या भाषेत बजेटमधील १५ अशा गोष्टी ज्या तुम्हाला माहिती असल्या पाहिजेत
“उद्धवदादा तुम्ही बाळासाहेबांचे विचार आणि आचार विसरू नका, तरूण पिढीला व्यसनाधिन करू नका”