vinayak raut : एकीकडे एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडामुळे शिवसेनेला गळती लागली आहे. तर दुसरीकडे शिवसेनेतील अंतर्गत नाराजीनाट्य समोर आलं आहे. यापूर्वी देखील अनेकदा शिवसेनेतील नाराजीनाट्य राज्याने पाहिलं आहे. त्यात आता आणखी भर पडली आहे. वाचा नेमकं शिवसेनेच्या गोटात काय झालंय?
त्याचं झालं असं की, शिवसेना खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) यांच्या विरोधात खूद्द शिवसैनिकांनी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्याकडे तक्रार केली आहे. यामुळे आता शिवसेनेच्या गोटात खळबळ उडाली आहे. यावर आता आदित्य ठाकरे काय निर्णय घेणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
धोपेश्वर रिफायनरी प्रकल्पाच्या विरोधातल्या विनायक राऊत यांच्या भूमिकेची शिवसैनिकांकडून तक्रार करण्यात आली आहे. आक्रमक शिवसैनिकांनी थेट आदित्य ठाकरे यांच्याकडे धाव घेतली आहे. विनायक राऊत यांच्या विरोधात शिवसेनेचे राजापूर उपविभाग प्रमुख संतोष चव्हाण यांनी आदित्य ठाकरे यांच्याकडे केली आहे.
एक पत्र शिवसैनिकांनी आदित्य ठाकरेंना दिलं आहे. ९० टक्के ग्रामस्थांचा विरोध असल्याचं चुकीचं वक्तव्य विनायक राऊत यांच्याकडून होतं असल्याचे पत्रात चव्हाण यांनी म्हटलं आहे. चव्हाण यांनी राऊत यांचं हे वक्तव्य चुकीचे असल्याचं पत्रात म्हटलं आहे. यामुळे आता सर्वांचे लक्ष आदित्य ठाकरेंच्या भूमिकेकडे लागले आहे.
दरम्यान, आता विनायक राऊत यांच्याबद्दल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे काय भूमिका घेणार? हे देखील पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. शिवसेनेतील अंतर्गत वादामुळे सध्या रत्नागिरीतील राजकीय वातावरण चांगलच तापलं असल्याचं दिसतं आहे. सध्या पक्षात सुरू असलेल्या नाराजीनाट्यवर ठाकरे पिता – पुत्र काय निर्णय घेणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या
उद्धव ठाकरेंना धक्क्यावर धक्के..! माजी आमदारासह तब्बल ५० पदाधिकाऱ्यांचा शिंदे गटात प्रवेश
Bachchu Kadu : बच्चू कडूंना राडा भोवला; कोर्टाने केली थेट कोठडीत रवाणगी, आता खावी लागेल जेलची हवा
Jayant Patil : महाराष्ट्रातील तरुणांचा हक्काचा रोजगार गमावल्याबद्दल मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री माफी मागतील का?
स्कुल बसचालकाचा चिमुकलीवर बलात्कार, २४ तासांत आरोपीच्या राहत्या घरावर बुलडोझर!