आठ दिवस होत आले, अजूनही युक्रेन आणि रशिया यांच्यामध्ये युद्ध सुरू आहे. रशियाने युक्रेन मधील अनेक ठिकाणं उध्वस्त करण्याचा सपाटा लावला आहे. याचदरम्यान एक मेसेज व्हायरल होत होता की, युक्रेनमध्ये भारतीयांचे होत असलेले हाल पाहून मोदींनी रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांच्याशी चर्चा केली आहे.
आता रशियाने युक्रेन मध्ये अडकलेल्या भारतीयांना बाहेर काढण्यासाठी सहा तास युद्ध थांबवण्याचे मान्य केले आहे. पण हे वृत्त खोटं असल्याचे उघड झाले आहे. रशियाने असे कोणतेही पाऊल उचलले नाही. हे वृत्त चुकीचे आहे. खारकीव्हमध्ये भारतीय विद्यार्थ्यांना युक्रेनच्या सैन्याने मानवी ढाल बनवल्याच्या आरोप रशियाने केला होता.
यादरम्यान भारतातील जनतेसाठी दिलासा देणारी बातमी समोर आली होती की खारकीव्हमध्ये अडकलेल्या भारतीयांच्या सुटकेसाठी रशियाने सहा तास युद्ध थांबवण्याचे मान्य केले आहे पण हे वृत्त खोटे आहे. परराष्ट्र मंत्रालयाने हे वृत्त खोटं असल्याचं स्पष्ट केलं आहे.
तिथे अडकलेल्या भारतीयांना खारकीव्हपासून युक्रेनच्या आजूबाजूच्या देशांच्या सीमेवर सुरक्षितपणे नेण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. सोशल मीडियावरील काही ट्विटमधून हा दावा करण्यात आला होता त्यामुळे आता भारतीयांचा फायदा घेऊन रशिया पासून वाचले जाणे युक्रेन स्थित नागरिकांना यापुढे शक्य होणार नाही असेही बोलले जात होते.
काही माध्यमांवर बातम्याही आल्या होत्या पण या सगळ्या बातम्या खोट्या आहेत. दरम्यान, युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना मायदेशी परत आणण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे पण अद्याप यावर तोडगा निघालेला नाही. भारतीय विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रियेच्या अनेक व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल होत आहेत.
या युद्धामुळे युक्रेनमधील अनेक नागरिकांना जीव गमवावा लागत आहे. त्यामुळे अनेकजण स्वत:ला वाचवण्यासाठी धडपड करत आहे. भारतातील हजारो विद्यार्थी तिथे शिकत आहे, त्यांनाही भारतातले आणले जात आहे. तसेच मेडिकलचे शिक्षण घेण्यासाठी गेलेली हजारो भारतातील मुले अडकली असून ते आपल्या देशात परतण्याचा प्रयत्न करत आहेत.
महत्वाच्या बातम्या
राज्यपालांनी असं निघून जाणे, भाषणावेळी त्यांचा अपमान होणे हे अयोग्य, आदित्य ठाकरेंनी व्यक्त केली खंत
पुण्यातील विवाहित महिला २० वर्षाच्या मुलासाठी पतीला सोडून गेली पळून; ऑनलाईन सुरु झाली होती लव्हस्टोरी
Russia Ukraine War: आतापर्यंत रशियाच्या किती सैनिकांचा मृत्यु झाला? पहिल्यांदाच समोर आली आकडेवारी
…तर तुमची गाडी लगेच भंगारात टाकली जाणार; मोदी सरकार नवीन नियम लागू करण्याच्या तयारीत