Share

सुनील ग्रोव्हरची झाली हार्ट सर्जरी, चाहते करत आहेत त्याच्यासाठी प्रार्थना; डॉक्टर म्हणाले..

Sunil Grover Had Heart Surgery

छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध कॉमेडियन सुनील ग्रोव्हरबाबत एक मोठी बातमी समोर येत आहे. सुनील ग्रोवरच्या ह्रदयाची शस्त्रक्रिया झाली (Sunil Grover Had Heart Surgery)  असून आता तो धोक्याच्या बाहेर असल्याचे सांगण्यात येत आहे. मुंबईच्या एशियन हार्ट इन्स्टिट्यूट येथे सुनील ग्रोव्हरवर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. दरम्यान, ही बातमी समोर येताच सुनीलच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.

समोर येत असलेल्या बातम्यांनुसार असे सांगण्यात येत आहे की, सुनील ग्रोव्हरच्या ह्रदयात एक ब्लॉकेज होता. त्यामुळे त्याच्यावर शस्त्रक्रिया करणे गरजेचे होते. परंतु, त्याच्या व्यग्र शेड्यूलमुळे त्याने आता शस्त्रक्रिया करून घेतली. सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानी त्यांच्या इन्स्टाग्राम हँडलवर सुनील ग्रोव्हरचा एक फोटो शेअर करत याबाबत पुष्टी दिली आहे.

फोटो शेअर करत लिहिण्यात आले की, अभिनेता सुनिल ग्रोव्हरने मुंबईच्या एशियाई हॉस्पिटलमध्ये हार्ट सर्जरी करून घेतली आहे. आता त्याच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. सुनीलच्या डॉक्टरांचे म्हणणे आहे की, आता तो धोक्याच्या बाहेर असून प्रकृतीतही खूपच सुधारणा होत आहे. सुनीलसाठी खूप प्रेम आणि प्रार्थना. सुनीलची ही बातमी समोर येताच चाहते तो लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करत आहेत.

सुनील ग्रोव्हरने ‘चला लल्ला हीरो बनने’ या मालिकेद्वारे त्याच्या करिअरची सुरुवात केली होती. याशिवाय तो सब टीव्हीवरील ‘गुटर गूं’ या शोद्वारे लोकांचे मनोरंजन केले. मात्र, त्याला ‘द कपिल शर्मा शो’मधील ‘गुत्थी’ आणि ‘डॉ. मशहूर गुलाटी’ या भूमिकेद्वारे फार लोकप्रियता मिळाली.

‘कपिल शर्मा शो’मधील आपल्या भूमिकेद्वारे सुनीलने प्रेक्षकांच्या मनात खास स्थान निर्माण केले होते. मात्र, एकदा ऑस्ट्रेलियावरून विमानात परतत असताना कपिलसोबत सुनीलचे जोरदार भांडण झाले. या वादामुळेच सुनीलने कपिल शर्मा शो सोडला होता. त्यांच्या या वादाची खूप चर्चा झाली होती. या वादानंतर कपिल आणि सुनील पुन्हा एकत्र काम करताना दिसून आले नाही.

टीव्हीसोबत सुनीलने मोठ्या पडद्यावरही काम केले आहे. तो ‘हीरोपंती’, ‘बागी’, ‘जिला गाजियाबाद’ आणि ‘गजनी’ यासारख्या चित्रपटात दिसला आहे. तसेच अमेझॉन प्राईम व्हिडिओच्या ‘तांडव’ या वेबसीरीजमध्येही तो दिसून आला. यासोबतच झी फाईव्हवर आलेल्या ‘सनफ्लॉवर’ नावाच्या वेबसीरीजमध्येही त्याने काम केले होते. या सीरीजमधील दमदार अभिनयासाठी त्याला फिल्मफेअरचा पुरस्कारही मिळाला होता.

महत्त्वाच्या बातम्या :
बॉलिवूड अभिनेते अमिताभ यांचं निधन, मृत्यूच्या ४ दिवस आधीचा व्हिडीओ झाला व्हायरल
‘त्या’ चित्रपटादरम्यान महिमा चौधरीसोबत घडली होती भयानक घटना, पूर्ण करिअरच झाले उद्ध्वस्त
तेजस्वी प्रकाश आणि करण कुंद्राचा ‘तो’ व्हिडिओ होतोय व्हायरल; लग्नाबाबत विचारल्यावर म्हणाले..

बाॅलीवुड मनोरंजन

Join WhatsApp

Join Now