Share

मुख्यमंत्री पदासाठी अडून बसलेले उद्धव ठाकरे म्हणतात, ‘मुख्यमंत्री बनणे हे माझं स्वप्न कधीच नव्हतं, पण…’

udhav thackeray

‘मुख्यमंत्री बनणं हे माझं कधीच स्वप्न नव्हतं. मी मुख्यमंत्री होईन असं कधी वाटलंही नव्हतं,’ असे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले आहे.  मुख्यमंत्री ठाकरे याबाबत भारतीय विमा कर्मचारी सेना महासंघाच्या रौप्य महोत्सवाच्या कार्यक्रमात बोलत होते. यावेळी त्यांनी राज्याच्या राजकारणात सुरू असलेल्या मुद्यांवर सविस्तर भाष्य केलं.

यावेळी बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, ‘मी मुख्यमंत्री होईन असं कधी वाटलंही नव्हतं, पण महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं आणि मी मुख्यमंत्री झालो. आता मी असेपर्यंत सीएम माझ्या पक्षाचा होत राहिल, हे ही माझं स्वप्न आहे,’ असं मोठं विधान मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केलं.

मुख्यमंत्री ठाकरेंनी यावेळी बोलताना खासगीकरणाच्या मुद्द्यावरुन निशाणा साधला. “खाजगीकरणाची खाज आज वाढायला लागलीय. कुठे-कुठे खाजवणार? असा सवाल उपस्थित करत ‘भवितव्य अंधारात जाणार असेल तर आपणाला न्याय हक्काची लढाई लढावी लागेल. भगव्यात ती ताकद सिद्ध करण्याची वेळ आलीय”, असं मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले.

तसेच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ज्या मैदानात सभा घेतली होती. त्याच औरंगाबादमधील मैदानात सभा घेण्यासाठी आता राजकीय पक्षांमध्ये स्पर्धा सुरू झाली आहे. महाराष्ट्र दिनी औरंगाबादमध्ये राज ठाकरे यांच्या जाहीर सभेनंतर आता राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेही याच मैदानावर सभा घेणार आहे.

दरम्यान, 14 मे रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सभा होणार आहे. त्यावेळी काय तो सवाल जवाब होऊनच जाऊदे असा इशाराच मुख्यमंत्र्यांनी दिला आहे. राज ठाकरे यांना शह देण्यासाठी आता खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेच मैदानात उतरले आहेत. औरंगाबादेत त्यांची 8 जूनला शिवसेनेच्या वर्धापन दिनी त्यांची सभा होणार आहे.

त्यामुळे शिवसेनेकडून सभेची जय्यत तयारी आतापासूनच सुरु करण्यात आली आहे. सभेच्या परवानगीबाबत पोलिसांना पत्र दिलं असल्याची देखील माहिती मिळत आहे. आता नेमकं या सभेमध्ये राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काय बोलतात? याकडे राज्याच लक्ष लागले आहे.

महत्त्वाच्या बातम्या
VIDEO: उर्वशी रौतेलाचा बाथरूममधील व्हिडीओ झाला लीक, सोशल मिडीयावर उडाली खळबळ
कॅमेऱ्याजवळ येताच उप्स मोमेंटची शिकार झाली दिपीका पादूकोन, गाडीतून उतरताच.., पहा व्हिडीओ
VIDEO: शहनाजने जिंकली चाहत्यांची मनं, ब्रम्हकुमारी सिस्टरसोबत दिसली तेव्हा खिळल्या लोकांच्या नजरा
VIDEO: ‘धाकड’ चित्रपटाचे पहिले गाणे रिलीज; चाहते म्हणाले, ‘कंगना फायर आहे, बॉलिवूडला आग लावणार’

इतर ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now