भारताच्या गानसम्राज्ञी लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांनी आज या जगाचा निरोप घेतला आहे. त्यांच्या जाण्याने देशभरात शोककळा पसरली असून संगीत क्षेत्रातील गानसरस्वती गमावल्याची भावना सर्वत्र व्यक्त करण्यात येत आहे. त्यांच्या निधनावर देशभरातून दुःख व्यक्त करण्यात येत असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही त्यांच्या भावना व्यक्त केल्या (CM Uddhav Thackeray On Lata Mangeshkar )आहेत.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शासकीय इसमामात लता मंगेशकर यांच्यावर अंत्यसंस्कार करण्याच्या सूचना दिल्याचे मुख्यमंत्री कार्यालयाद्वारे सांगण्यात आले आहे. मुख्यमंत्री कार्यालयाद्वारे याविषयी एक पत्रक काढून माहिती देण्यात आली आहे.
भारतरत्न लता मंगेशकर यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी दिल्या आहेत.
— Office of Uddhav Thackeray (@OfficeofUT) February 6, 2022
मुख्यमंत्र्यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले की, ‘स्वरसम्राज्ञी लतादीदी आपल्यातून देहाने नाहीशा झाल्या. हे अत्यंत दुःखद आहे. पण त्या त्यांच्या अमृत स्वरांनी अजरामर आहेत. अनादि आनंदघन म्हणून त्या स्वर अंबरातून आपल्यावर स्वरअमृत शिंपीत राहतील’.
‘लता दिदींच्या जाण्यानं एका स्वर युगाचा अंत झाला, एक महान पर्व संपले. आमच्यावरचा मातृतुल्य आशीर्वाद हरपला’, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लता मंगेशकर यांच्या निधनावर आपल्या भावना व्यक्त करत लतादिदी यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.
https://twitter.com/CMOMaharashtra/status/1490190666466721794?s=20&t=WkGJn_MaYGqeI-sIFcj1ug
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांनीही लता मंगेशकरांच्या निधनावर आपला दुःख व्यक्त केला आहे. त्यांनी म्हटले की, ‘लता दीदी आपल्यात नाहीत ही कल्पनाच सहन होत नाही. बाळासाहेबांनंतर त्याच आमच्या आधार होत्या. सुखदुःखाच्या क्षणी आवर्जून पाठीशी राहणाऱ्या दिदींच्या जाण्यानं आमच्या परिवारावर मोठा आघात झाला आहे’.
https://twitter.com/OfficeofUT/status/1490202888945401856?s=20&t=WkGJn_MaYGqeI-sIFcj1ug
दरम्यान, लता मंगेशकर यांना कोरोनाची लागण झाल्याने ८ जानेवारी रोजी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्या निमोनिया या आजाराशीही झुंज देत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. ८ जानेवारीपासून लता मंगेशकर रूग्णालयातच दाखल होत्या. त्यानंतर काल त्यांची प्रकृती खालावली असून त्यांना पुन्हा व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आल्याचे डॉक्टरांद्वारे सांगण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यानच आज सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली.
महत्त्वाच्या बातम्या :
लतादीदींच्या जाण्याने मोदींवर कोसळला दुःखाचा डोंगर; म्हणाले, माझ्याकडे बोलायला शब्द नाहीत..
भारतरत्न लता मंगेशकर यांचे वयाच्या ९२ व्या वर्षी निधन, कलाविश्वावर शोककळा
‘ना कजरे की धार..’ गाण्यातील अभिनेत्रीचा आता बदललाय लूक; दिसते खूपच ग्लॅमरस, पहा फोटो