shinde : भाजपसोबत सरकार स्थापन करून एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाचा कारभार स्विकारला आहे. सत्तेत असून देखील एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंसोबत गद्दारी केली. अन् भाजपसोबत युती करून राज्यात पुन्हा शिवसेना – भाजप युतीचे सरकार स्थापन केले.
मात्र यावरून आता खरी शिवसेना कोणाची यावरून नवा वाद निर्माण झाला असून तो वाद थेट निवडणूक आयोगाच्या गोटात गेला आहे. तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्या डोक्यावर भाजप नेत्यांचा हात असल्याचं बोललं जातं आहे. मात्र एकनाथ शिंदे यांनी सर्व श्रेय वेगळ्याच व्यक्तीला दिलं आहे.
स्वामीनारायण यांची कृपी म्हणूनच मी मुख्यमंत्री झालो, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्टच सांगितलं आहे. शिंदे यांनी नाशिक केलेल्या या वक्तव्याची सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे. शिंदे यांच्या वक्तव्याने भाजप नेत्यांच्या भुवया उंचवल्या आहेत.
नाशिकच्या तपोवन येथे बी.ए.पी.एस. स्वामीनारायण मंदिर वेदोक्त मुर्तीप्रतिष्ठाविधी सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी बोलताना शिंदे म्हणाले, स्वामीनारायण मंदीर हे तीर्थयात्री, पर्यटक यांच्यासाठी अभिनव व आध्यात्मिक आकर्षणाचे केंद्र झाले आहे, असं देखील शिंदे म्हणाले.
दरम्यान, मंदिर प्रशासनाने जनतेची सेवा करावी त्यांच्या पाठीमागे सरकार भक्कमपणे उभे राहील असा विश्वास शिंदे यांनी व्यक्त केला. तीन महिन्यापूर्वी राज्यात आपलं सरकार आले आहे. सर्वांना सोबत घेऊन पुढे जायचे आहे. त्यामुळे हे तुमचं सरकार असल्याचे शिंदे यांनी सांगितलं.