Chief Minister : दारूच्या नशेत असल्यामुळे मुख्यमंत्र्यांना विमानातून खाली उतरवले?; आपचे भगवंत मान यांच्यावर विरोधकांचा गंभीर आरोप

Chief Minister: शिरोमणी अकाली दलाचे सुखबीर सिंग बादल यांनी पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. दारूच्या नशेत असलेल्या भगवंत मान यांना फ्लाईटमधून खाली उतरवण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. पंजाबचे मुख्यमंत्री जर्मनीहून दिल्लीला परत येत असताना हा प्रकार घडल्याचे बोलले जाते.

बादल यांनी केलेल्या या घणाघाती आरोपामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ माजली. मुख्यमंत्र्यांना दारूच्या अती नशेत असल्यामुळे फ्लाईटमधून खाली उतरवण्यात आल्याने आपला मोठा अपमान झाला, अशी चर्चा पंजाबमध्ये रंगली. मात्र आम आदमी पार्टीने हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.

पंजाबचे मुख्यमंत्री जर्मनीला गेले होते. तिथून परत येत असताना हा प्रकार घडला असल्याचे शिरोमणी अकाली दलाच्या बादल यांनी सांगितले. मात्र बादल यांनी केलेल्या या आरोपाला पंजाब सरकारच्या वतीने कोणतेही प्रत्युत्तर देण्यात आलेले नाही.

मान हे नशेत असल्यामुळेच फ्लाईटला तब्बल चार तास उशीर झाला असेही बादल म्हणाले. मुख्यमंत्री भगवंत मान यांच्यावर प्रवासादरम्यान दारूची अति नशा केल्याचे असे गंभीर आरोप झाले. या पार्श्वभूमीवर त्यांनी जर्मनी ते दिल्ली प्रवास ज्या विमानातून केला. त्या लुंफ्थासा एअरलाइन्सने याबाबत स्पष्टीकरण जारी केले आहे.

फ्रॅंकफर्ट ते दिल्ली या फ्लाईटला इनबाउंड फ्लाईटमुळे तसेच विमानात बदल झाल्यामुळे उशीर झाला. आमची फ्लाईट त्यामुळेच ठरलेल्या वेळेपेक्षा उशिरा पोहोचली. इतर कोणतेही कारण फ्लाईटला उशीर होण्यामागे नव्हते, असे स्पष्टीकरण एअरलाइन्सने दिले आहे.

या सगळ्या प्रकरणाबाबत केजरीवालांनी स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी विरोधक करत आहेत. तर आम आदमी पार्टीच्या प्रवक्त्याने भगवंत मान यांच्यावर विरोधक करत असलेल्या आरोपांमध्ये तथ्य नाही. असे काही घडलेच नसल्याचे म्हंटले आहे.

महत्वाच्या बातम्या-
Raj Thackeray : मनसे पदाधिकाऱ्यांकडून महीलेची फसवणूक; महीलेने थेट राज ठाकरेंना अडवून न्यायासाठी पसरला पदर
Dussehra gathering : शिवसेनेला शिवतीर्थावर दसरा मेळावा घेण्यास परवानगी द्यावी, कारण..; मनसेने केली मागणी
Sharad Pawar : पत्राचाळ घोटाळ्यातील मास्टर शरद पवारच; गंभीर आरोप करत चौकशीची मागणी