cm eknath shine poster in ind vs pak match | रविवारी टी २० वर्ल्डकपमधला भारताचा पहिला सामना पार पडला. हा सामना कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी होता. या सामन्यात भारतीय संघाने ४ विकेट्सने विजय मिळवला आहे. हा सामना खुपच थरारक झाला होता. पण विराटच्या जबरदस्त खेळीमुळे भारतीय संघाला हा सामना जिंकता आला.
हा सामना जिंकत भारतीय संघाने २०२१ च्या टी २० वर्ल्डकपमध्ये झालेल्या पराभवाचा बदला घेतला आहे. ऐनदिवाळीत हा सामना जिंकल्यामुळे भारतीयांची दिवाळी आणखीनच गोड झाली आहे. हा सामना ऑस्ट्रेलियील मेलबर्नमध्ये खेळला जात होता. पण तिथे एक अशी गोष्ट समोर आली, जे पाहून महाराष्ट्रातील लोकांना आश्चर्याचाच धक्का बसला.
मेनबर्नच्या मैदानावर महाराष्ट्रातील राजकीय नेत्यांची पोस्टरबाजी पाहायला मिळाली. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे बॅनर घेऊन चाहते मैदानात दिसून आले. एकनाथ शिंदे यांचे समर्थक मैदानात बॅनर घेऊन पोहचले होते. या बॅनरचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले.
या बॅनरवर छत्रपती शिवाजी महाराज, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोटो होता. त्यावर वारसदार बाळासाहेबांच्या विचारांचे, अखंड हिंदुत्वाचे असे लिहिलेले होते. तसेच या बॅनरवर एकनाथ शिंदे यांच्या गटाला मिळालेले ढाल आणि तलवार हे चिन्ह सुद्धा होते.
मिळालेल्या माहितीनुसार, शिंदे समर्थक असलेला तो व्यक्ती ठाण्यातील दिवा भागातील होता. तो भारत-पाकिस्तानचा सामना पाहण्यासाठी मेलबर्नला गेला होता. त्यावेळी मैदानात असताना त्याने शिंदे यांचा बॅनर झळकावला होता. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर खुप व्हायरल होत आहे.
तसेच काँग्रेसच्या एका कार्यकर्त्याने देखील इथे हजेरी लावली होती. त्याने भारत जोडो यात्राया बॅनर याठिकाणी झळकावला होता. याचाही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या पोस्टरवर काँग्रेसचे नेते राहूल गांधी आणि इतर नेत्यांचे फोटो लावलेले होते.
दरम्यान, भारत-पाकिस्तानचा सामना खुपच थरारक झाला होता. पाकिस्तानने पहिल्यांदा फलंदाजी करत ८ विकेट्स गमावून १५९ धावा केल्या. त्यामुळे १६० धावांचे लक्ष्य भारतीय संघाला मिळाले. भारताच्या सुरुवातीलाच एकामागोमाग एक विकेट पडत गेल्या. पण विराटने ८२ धावा ठोकत भारतीय संघाला ४ विकेट्सने विजय मिळवून दिला.
महत्वाच्या बातम्या-
shivsena : राजकीय भूकंप! शरद पवारांचा विश्वासू पक्षाला सोडचिठ्ठी देणार, वाचा नेमकं काय घडलंय?
Hardik Pandya : सामना जिंकूनही सगळ्यांसमोर ढसाढसा रडू लागला हार्दीक पांड्या; ‘हे’ धक्कादायक कारण आले समोर
shivsena : कोल्हापूरमध्ये राजकीय भूकंप ! बड्या नेत्याने सोडली पवारसाहेबांची साथ, राजकीय समीकरण बदलणार