आज राज्यात शिंदे- फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे. अशातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना धक्का देणारी बातमी समोर आली आहे. एकनाथ शिंदे यांच्या पुतण्याला अटक करण्यात आली आहे. याबद्दल दैनिक सामानाने वृत्त दिलं आहे.
माहितीनुसार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुतणे महेश शिंदे यांना अटक केली आहे. गुन्हे शाखेच्या पोलिसांनी महेश शिंदे याच्यावर अटकेची कारवाई केली आहे. आधी त्याला चौकशी करून सोडून देण्यात आलं होतं. मात्र या प्रकरणाची चर्चा झाल्यानंतर त्याला रात्री उशिरा पुन्हा पोलिसांनी ताब्यात घेतलं. त्यानंतर अटक करण्यात आली आहे.
महेश शिंदे याच्यासह १० जणांना अटक केली असल्याची माहिती मिळाली आहे. एका क्लबमध्ये हे सर्वजण जुगार खेळत होते. तसंच ज्या रूममध्ये हे जुगार खेळत होते ती रूम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पुतण्या महेश शिंदे याच्या नावे बूक केली होती.
याप्रकरणी अधिक माहिती म्हणजे, मीरा-भाइंदर, वसई-विरार पोलिसांच्या गुन्हे शाखेनं महेश शिंदे यांना शुक्रवारी अटक केली. महेश शिंदे हे इतर १० जणांसोबत मीरारोड इथल्या सीजीजी क्लब हॉटेलमध्ये जुगार खेळताना सापडले होते. जुगार खेळाबाबतची माहिती मीरा भाईंदर आणि वसई विरार पोलिसांच्या गुन्हे शाखेला मिळाली होती.
त्यानंतर पोलिस निरीक्षक अविराज कुऱ्हाडे यांनी छापा टाकून बेकायदेशीर जुगार खेळणाऱ्यांना ताब्यात घेतलं होतं. एकनाथ शिंदे यांचा पुतण्याचा या जुगार खेळात सहभाग असल्याचं आढळल्यानं चर्चा सुरू झाली होती. जीसीसी क्लब हॉटेलच्या ७९४ नंबर रुममध्ये १० जण जुगार खेळत होते.
चौकशीनंतर त्यांना सोडूनही देण्यात आलं होतं. मात्र प्रकरणाची चर्चा जास्त व्हायला लागल्यानं त्यांना रात्री पुन्हा एकदा अटक करण्यात आली. एकनाथ शिंदे यांच्या पुतण्याला जुगार खेळताना अटक केली त्यामुळे सध्या राजकीय वर्तुळात त्याचीच चर्चा आहे. या प्रकरणाचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर परिणाम होणार का हे येणाऱ्या दिवसांत पाहायला मिळेल.