Share

cm eknath shinde : मुख्यमंत्री शिंदे 40 आमदारांना सोबत घेऊन थेट दिल्ली दरबारी जाणार; पुन्हा होणार राजकीय भूकंप

Eknath Shinde's MLA

cm eknath shinde : राज्यात नुकताच झालेला राजकीय भूकंप हा शिवसेनेची झोप उडवणारी ठरला. शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची साथ सोडली. अन् बंड पुकारला 40 आमदारांना सोबत घेऊन शिंदे यांनी राज्याच्या राजकारणात राजकीय भूकंप घडवून आणला.

यामुळे उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पद सोडावं लागलं. सोबतच राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेसला देखील सत्तेतून बाहेर पडावं लागलं. ठाकरे सरकार सत्तेतून गेल्यापासून शिवसेनेला जबर धक्के बसतं आहेत. तर दुसरीकडे आता पुन्हा राज्याच्या राजकारणात भूकंप होणार असल्याच बोललं जातं आहे.

त्याचं झालं असं, राज्यात शिंदे सरकार स्थापन झाल्यापासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दिल्लीवाऱ्या सुरू झाल्या आहेत. मुख्यमंत्री पद स्वीकारल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी थेट दिल्लीला जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. पंतप्रधान मोदी आणि शिंदे यांची भेट राजकीय चर्चेचा विषय बनला होता.

तर आता हाती आलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री शिंदे हे आपल्यासोबत 40 आमदारांनीही घेऊन दिल्लीला जाणार असल्याचं बोललं जातं आहे. विशेष बाब म्हणजे सर्व आमदारांसाठी महाराष्ट्र सदनामध्ये रूम्स सुद्धा बूक करण्यात आल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, उद्या मुख्यमंत्री शिंदे दिल्लीत दाखल होणार आहेत.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून राज्यात वेदांता फॉक्सकॉन प्रकल्पावरून राजकारण सुरू आहे. विरोधकांकडून शिंदे सरकारवर टीका होतं आहे. तर दुसरीकडे सत्ताधारी देखील विरोधकांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करतं आहेत. असं असतानाच आता शिंदे दिल्लीत वेदांता फॉक्सकॉन प्रकल्पाबाबत काही निर्णय काढणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

मुख्यमंत्री शिंदे यांच्या दिल्ली दौऱ्याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, विविध रखडलेले प्रकल्प मार्गी लावण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे केंद्रीय मंत्र्यांची भेट घेण्याची शक्यता असल्याच बोललं जातं आहे.  केंद्रीय मंत्री आश्विणी वैष्णव आणि नितीन गडकरी यांचीही भेट घेणार असल्याच बोललं जातं आहे.

महत्त्वाच्या बातम्या
Raj Thackeray : मनसे पदाधिकाऱ्यांकडून महीलेची फसवणूक; महीलेने थेट राज ठाकरेंना अडवून न्यायासाठी पसरला पदर
Dussehra gathering : शिवसेनेला शिवतीर्थावर दसरा मेळावा घेण्यास परवानगी द्यावी, कारण..; मनसेने केली मागणी
Narayan Rane : नारायण राणेंना हायकोर्टाचा दणका ; १० लाखांचा दंडही ठोठावला, वाचा काय आहे नेमकं प्रकरण
Police : ‘यापुढे खाकी वर्दी घालून नाचल्यास खैर नाही’; वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून पोलिसांना कठोर निर्देश
इतर ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now