eknath shinde : शिवसेना नेमकी कोणाची? यावरून सध्या शिवसेनेतील दोन गटांमध्ये वाद सुरू आहे. एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यामुळे शिवसेनेत उभी फुट पडली आहे. यावरून राज्यात मोठा राजकीय वाद देखील निर्माण झाला आहे. शिंदे यांनी बंड करताच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पदावरून पाय उतार व्हावं लागलं.
राज्यातील सत्तासंघर्ष थेट कोर्टात पोहचला आहे. तर दुसरीकडे राज्याच्या राजकारणात देखील तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. अशातच आज सर्वोच्च न्यायालयात राज्यातील सत्तासंघर्षावर सुनावणी पार पडली. मात्र याच दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने एक मोठा निर्णय दिला आहे.
आज एकनाथ शिंदे विरुद्ध उद्धव ठाकरे या सत्तासंघर्षावर सुप्रीम कोर्टासमोर दोन्ही गटातर्फे युक्तिवाद झाले. कोर्टाने दोन्ही पक्षकारांना आपापले युक्तिवाद लिखित स्वरुपात देण्याचे आदेश दिले आहेत. मात्र तीन आठवड्यात यासंदर्भातील कागदपत्र दाखल करण्याच्या सूचना कोर्टाने दिल्या आहेत.
पुढे कोर्टाने आदेश दिले आहेत की, एकनाथ शिंदेंसह 16 आमदारांच्या अपात्रतेसंबंधी याचिकेवरील पुढील सुनावणी आता 29नोव्हेंबर रोजी होणार आहे. २९ नोव्हेंबर रोजी सुनावणीसाठी कोणती तारीख द्यायची, हे सांगितलं जाईल, असे कोर्टाने आज स्पष्ट करत सुनावणी पुढे ढकलली आहे.
दरम्यान, पाच न्यायाधीशांच्या घटनापीठासमोर ही सुनावणी सुरु झाली. पण न्यायाधीशांनी सुनावणी सुरु होताच दोन्ही बाजूंना काही महत्त्वाचे निर्देश दिले. आणि पुढील सुनावणी चार आठवड्यांनी म्हणजेच २९ नोव्हेंबर रोजी घेणार असल्याचे सांगितले. कोर्टाने दिलेल्या आदेशानुसार आता ही सुनावणी २९ नोव्हेंबर रोजी होणार आहे.
न्यायाधीश चंद्रचुड यांनी सांगितलं की, दोन्ही बाजूंच्या वकीलांनी समोरासमोर बसा बैठक घ्या. कुठल्या मुद्द्यावर कोण युक्तीवाद करणार हेही आपसात ठरवा. दोन दोन वकीलांनी कागदपत्रे बनवा, गोषवारा तयार करा आणि दोन्ही गटांनी कागदपत्रांचा गोषवारा सादर करा.
bjp : टाईमपास’फेम दगडू गेला भाजपच्या मुरजी पटेलांच्या रॅलीत, म्हणाला, “माझ्या घरात गटाराचं पाणी…
Timepass 3: टाईमपास ३ चा बाॅक्स ऑफीसवर जोरदार धडाका; ३ दिवसांत केली तब्बल ‘एवढ्या’ कोटींची कमाई
आईबाबा आणि साईबाबाची शप्पथ; टाईमपास ३ चा टीझर रिलीज, हृताचा राऊडी लूक आला समोर
आपल्या दोस्ताला जो नडेल त्याचा आपण; टाईमपास ३ मध्ये राऊडी लूकमध्ये दिसणार हृता, पहा टीझर