शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्यानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे महाराष्ट्र दौऱ्यावर निघाले आहेत. याकरिता नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यात मध्यरात्री दोन वाजता मुख्यमंत्री दाखल झाले. याप्रसंगी मालेगाव येथे अनेक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.
तसेच शहरात जाहीर सभादेखील घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. शिंदे गटातील आमदार व माजी कृषिमंत्री दादा भुसे आणि समर्थकांनी यावेळी मुख्यमंत्र्यांचे जंगी स्वागत केले. या पाशर्वभूमीवर मालेगाव मनपा प्रशासनाकडून जोरदार तयारी करण्यात आली होती.
मुख्यमंत्री पहिल्यांदाच महाराष्ट्र दौऱ्यावर निघाले आहेत. मध्यरात्री दोन वाजता त्यांचे मालेगाव तालुक्यात आगमन झाले. यावेळी त्यांनी लोकांना डीजे बंद करायला लावला. तसेच माईकचा वापर न करता त्यांनी उपस्थितांशी खणखणीत आवाजात संवाद साधला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मालेगावमधील विविध विकास कामांचा आढावा घेणार आहेत. त्यासोबतच जाहीर सभेमध्ये शिंदे मालेगाव जिल्हा निर्मितीची घोषणा करणार असल्याची शक्यता वर्तविली जात आहे. नाशिक महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांचा हा दौरा महत्वपूर्ण मानला जात आहे.
यावेळी मालेगावकरांसाठी मुख्यमंत्री नेमक्या काय घोषणा करतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांची संजय राऊत यांच्यासोबत झालेल्या मुलाखतीत ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच बंडखोरी करणाऱ्या सर्व आमदार, खासदार यांच्यावर टीका केली. त्यावर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज नाशिक दौऱ्यावर आहेत. त्यांनी बंडखोर नेते, माजी मंत्री दादा भुसे यांच्या मालेगावात सभा घेत मोठं शक्तीप्रदर्शन केलं. त्यावेळी भाषणात त्यांनी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह त्यांच्यासोबत असलेल्या सेना नेत्यांवर जोरदार टीका केली आहे.
एकनाथ शिंदे म्हणाले, आमच्या माथ्यावर गद्दारीचा शिक्का मारला जातोय. पण आम्ही गद्दार नाही. आम्ही आनंद दिघे आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाची शिकवण घेऊन पुढे चाललोय. काँग्रेस राष्ट्रवादीबरोबर कधी युती करणार नाही, तशी वेळ आली तर आम्ही आमचं दुकान बंद करु असं बाळासाहेब म्हणाले होते.
म्हणाले, ज्यांच्यासोबत लढलो, त्यांच्याविरोधात जाऊन मुख्यमंत्रिपदासाठी वेगळी भूमिका घेतली. मुख्यमंत्रीपदासाठी यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीला जवळ केले. बाळासाहेबांनी हिंदुत्वासाठी कधी तडजोड केली नाही, त्यांनी विचारांशी कधी प्रतारणा केली.
उद्धव ठाकरे आणि माझ्यातील ज्या गोष्टी आहेत, त्या मी आज सांगणार नाही. मात्र एक दिवस मलाही तोंड उघडावे लागेल, मलाही भूकंप करावा लागेल. मी कधीही कोणावर खालच्या भाषेत बोलत नाही, मात्र अन्याय झाला तर सहन करणार नाही, असा इशारा त्यांनी उद्धव ठाकरेंना दिला.
महत्वाच्या बातम्या
आनंद दिघेंसोबत जे घडलं त्याचा मी साक्षीदार, जास्त बोलाल तर तोंड उघडेल; शिंदेंची ठाकरेंना थेट धमकी
शाळेत येताच विद्यार्थीनी रडू लागल्या अन् बेशुद्ध पडल्या; उपायासाठी बोलावले मांत्रिकाला
‘या’ व्यक्तीने बनवली अनोखी सायकल, सुनील शेट्टीही झाला फॅन, म्हणाला, ‘ब्रिलियंट आयडिया’
Prostitution: वेश्याव्यवसायाच्या आरोपाखाली भाजप नेत्याला अटक, नंतर फार्महाऊसवर सापडली स्फोटकं